ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खुल्या बाजारात विक्री (स्थानिक बाजारपेठांमध्ये) योजनेंतर्गत 1 फेब्रुवारी 2023 पासून 25 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री सुरू होणार
Posted On:
27 JAN 2023 10:30PM by PIB Mumbai
खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत (स्थानिक बाजारपेठांमध्ये) फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून (1 फेब्रुवारी, 2023) पंचवीस लाख मेट्रिक टन गहू विक्रीसाठी काढला जाणार असून त्यासाठी आज भारतीय खाद्य महामंडळ (FCI) च्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे निविदा अपलोड केल्या जातील.
गव्हाचा साठा खरेदी करण्यास इच्छुक खरेदीदार भारतीय खाद्य महामंडळ (FCI) च्या ई-लिलाव सेवा प्रदात्याच्या "m-Junction Services Limited" (https://www.valuejunction.in/fci/ ) सोबत पॅनेलमध्ये सामील होऊ शकतात आणि साठ्यासाठी बोली लावू शकतात. ज्या पक्षांना त्यांची नावे नोंदवायची आहेत त्यांच्यासाठी 72 तासांच्या आत पॅनेलमध्ये सहभागी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
वाढत्या किमती ताबडतोब नियंत्रणात ठेवल्या जातील याची खात्री करण्यासाठी देशातील सर्व राज्यांमधून साठ्याचा प्रस्ताव दिला जाईल.
देशातील गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतीला तोंड देण्यासाठी भारतीय खाद्य महामंडळ 30 लाख मेट्रिक टन गहू, खुल्या बाजारातील विक्री योजनेंतर्गत (स्थानिक बाजारपेठांमध्ये) विविध मार्गांद्वारे बाजारात उपलब्ध करून देईल असा निर्णय घेण्यात आला. या योजनेची घोषणा झाल्यापासून 24 तासांच्या आत, भारतीय खाद्य महामंडळाने देशभरात साठ्याच्या ई-लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.
खुल्या बाजार विक्री (घरगुती) योजनेद्वारे 30 लाख मेट्रिक टन गहू दोन महिन्यांच्या कालावधीत अनेक चॅनेलद्वारे बाजारात उतरवल्याने गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतींवर तत्काळ परिणाम होईल आणि वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळेल.
अन्नधान्याची खरेदी देशभरात समान प्रमाणात होत नाही, हे येथे निर्देशित करणे योग्य ठरेल. काही राज्यांमध्ये त्यांच्या गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणात उत्पादन होते , तर इतर राज्यांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः तूट असते. म्हणून, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात समाजातील असुरक्षित घटकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय खाद्य महामंडळाने मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची चळवळ हाती घेतली आहे.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894234)
Visitor Counter : 193