सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय प्रजासत्ताक सरकार आणि अरब प्रजासत्ताक इजिप्त सरकार यांच्यातील सांस्कृतिक सहकार्यावरील सामंजस्य करार

प्रविष्टि तिथि: 27 JAN 2023 6:18PM by PIB Mumbai

 

इजिप्तच्या अरब प्रजासत्ताकबरोबर सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी, संस्कृती मंत्रालयाने भारत प्रजासत्ताक सरकार आणि अरब प्रजासत्ताक इजिप्त सरकार यांच्यात सांस्कृतिक सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अरब प्रजासत्ताक इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत भाग घेतला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तच्या अरब प्रजासत्ताकाचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्या उपस्थितीत, 25.01.2023 रोजी भारताचे  प सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री समेह हसन शौकरी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून करारपत्राची देवाणघेवाण केली. 

पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण सांस्कृतिक सहकार्यासाठी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारत आणि इजिप्त दरम्यान स्वाक्षरी केलेल्या सांस्कृतिक सहकार्यावरील सामंजस्य कराराच्या अंतर्गत, दोन्ही देश संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, ग्रंथालय, संशोधन, आणि दस्तऐवजीकरण इ. तसेच संबंधित देशांमध्ये महोत्सवांचे आयोजन या क्षेत्रात होत असलेल्या सांस्कृतिक उपक्रमांचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहेत.

***

S.Bedekar/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1894166) आगंतुक पटल : 282
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी