इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

पहिली इंडिया स्टॅक डेव्हलपर परिषद 25 जानेवारी 2023 रोजी संपन्न


इंडिया स्टॅक सोल्युशन्ससाठी आधार, डिजीलॉकर, यूपीआय , उमंग, दीक्षा, ई-संजीवनी सारख्या नवीन आणि पुढील पिढीच्या सेवांवर झाली चर्चा

Posted On: 25 JAN 2023 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023

 

पहिल्या इंडिया स्टॅक डेव्हलपर परिषदेचे  उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते झाले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा, नॅस्कॉमच्या अध्यक्ष देबजानी घोष आणि अभिषेक सिंग, P&CEO, NeG उपस्थित होते. या कार्यक्रमात CXO/MD/संस्थापक स्तरावर उद्योग संघटना , सिस्टीम इंटिग्रेटर्स आणि स्टार्ट-अप्समधील 100+ डिजिटल प्रमुखांनी  भाग घेतला होता.  या कार्यक्रमात जी 20 देशांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या परिषदेचा उद्देश अन्य देशांपर्यंत इंडिया  स्टॅक व्याप्ती आणि अवलंब वाढवणे जे  त्यांच्या गरजेनुसार ते स्वीकारण्यास आणि एकत्रित करण्यास तसेच स्टार्टअप, विकासक आणि  सिस्टीम इंटिग्रेटरची एक मजबूत परिसंस्था  तयार करण्यास उत्सुक आहेत . "एक राष्ट्र म्हणून इंडिया स्टॅक किंवा स्टॅकचा भाग जगभरातील अशा उद्योगांना आणि देशांना उपलब्ध  करणे हे आमचे ध्येय आहे ज्यांना अभिनव संशोधन करायचे आहे आणि डिजिटल परिवर्तनाची  अधिक एकात्मिकपणे अंमलबजावणी करायची आहे.", असे ते  म्हणाले.

इंडिया स्टॅकमध्ये आणखी सुधारणा होतील असे सांगून ते  म्हणाले, आज आपल्याकडे जे आहे ते #IndiaStack 1.0 आहे. ते अधिक सूक्ष्म, बुद्धिमान  आणि अत्याधुनिक होईल आणि काळाच्या ओघात  विकसित होत राहील. डेटा डेटासेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर हा इंडिया स्टॅकच्या नाविन्यपूर्ण प्रवासाचा भाग असेल.

आधार, राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान  (NDHM), युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI), डिजिलॉकर , उमंग , एपीआय सेतू, DIKSHA, e-संजीवनी, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM)सारख्या इंडिया स्टॅक सोल्युशनवर संबंधित संस्थेचे प्रमुख आणि/किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी सादरीकरण केले.  सादरीकरणाची प्रत  https://indiastack.global. वर अपलोड केली आहे.

 

 

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1893794) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu