अर्थ मंत्रालय

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC), महसूल विभागाचे 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन 2023 च्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले जाणार

Posted On: 25 JAN 2023 7:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023

 

दरवर्षी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती पुरस्कार आणि पदक प्रदान करून सन्मान केला जातो. आपली सेवा बजावताना प्राणांची बाजी लावून सादर केलेली अपवादात्मक गुणवत्तापूर्ण सेवा आणि विशेष कामगिरीचा विक्रम यासाठी त्यांना पुरस्काराने पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार घोषित केले जातात.

यावर्षी, 29 अधिकारी/कर्मचाऱ्यांची "अतिविशिष्ट सेवेसाठी" राष्ट्रपती प्रमाणपत्रे आणि पदकांसाठी निवड करण्यात आली आहे.

या अधिकार्‍यांची निवड त्यांच्या संबंधित सेवा क्षेत्रातील अनेक वर्षांच्या असामान्य आणि अचूक कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे. यावर्षी निवड झालेल्या पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये प्रधान मुख्य आयुक्त, आयुक्त, अतिरिक्त महासंचालक, संचालक, अतिरिक्त संचालक, सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, अधीक्षक, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, निरीक्षक आणि कनिष्ठ विभागीय लिपिक या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, गेली अनेक वर्षे ते विभागाच्या विविध क्षेत्रांमध्ये सातत्त्याने सेवा देत आहेत.

प्रजासत्ताक दिन, 2023 निमित्त "विशेष सेवेसाठी" राष्ट्रपती पुरस्कारा अंतर्गत प्रमाणपत्रे आणि पदक प्रदान करण्यासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांची यादी, त्यांचे पदनाम आणि त्यांच्या सध्याच्या नियुक्तीची जागा यासह पुढे दिली आहे:

1.श्रीमती. रंजना झा, प्रधान मुख्य आयुक्त, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, बेंगळुरू विभाग;

2.श्री विवेक प्रसाद, आयुक्त, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, गौतम बुद्ध नगर;

3.श्री प्रभजीत सिंग गुलाटी, अतिरिक्त महासंचालक, दक्षता महासंचालनालय (मुख्यालय), नवी दिल्ली;

4.श्री विनायक चंद्र गुप्ता, अतिरिक्त महासंचालक, प्रणाली आणि डेटा व्यवस्थापन महासंचालनालय, नवी दिल्ली;

5.डॉ. एन. गांधी कुमार, संचालक (राज्य कर), महसूल (मुख्यालय), महसूल विभाग, नवी दिल्ली;

6.श्री कोत्रास्वामी मारेगौद्रा, अतिरिक्त संचालक (HRM-I), मनुष्यबळ विकास महासंचालनालय, नवी दिल्ली;

7.श्री आनंद यशवंत गोखले, सह आयुक्त, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (लेखापरीक्षण-I), मुंबई;

8.श्री अजय कुमार बेनिवाल, सहाय्यक संचालक, विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय, नवी दिल्ली;

9.श्री बिरांची नारायण मिश्रा, सहाय्यक आयुक्त (टपाल मूल्यमापन विभाग), आयात-II आयुक्तालय, मुंबई विभाग-I;

10.सुश्री ए. गीता देवानंद, मुख्य लेखा अधिकारी, नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ, बंगलोर;

11.श्री जे. फ्रेडरिक सरगुरु डॉस, अधीक्षक, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, कोईम्बतूर, चेन्नई विभाग;

12.श्रीमती. एम. शांती, अधीक्षक, दक्षता महासंचालनालय, दक्षिण विभागीय युनिट, चेन्नई;

13.श्रीमती. नादिया नईम शेख, अधीक्षक, केंद्रीय वस्तू व सेवा कर, बेलापूर, मुंबई विभाग;

14.श्री गायकवाड नितीन विनायकराव, अधीक्षक, मुख्य आयुक्त कार्यालय, केंद्रीय वस्तू व सेवा कर, पुणे विभाग;

15.श्री प्रशांत अरविंद रोहणेकर, अधीक्षक, केंद्रीय वस्तू व सेवा कर, पुणे-1, पुणे विभाग;

16.श्री प्रकाश मुसलियाथ, अधीक्षक, सीमा शुल्क प्रतिबंधक विभाग, कालिकत, सीमाशुल्क (प्रतिबंधक) आयुक्तालय, कोचीन, तिरुवनंतपुरम विभाग;

17.श्री रोमियो लॉरेन्स अल्बुकर्क, अधीक्षक, राष्ट्रीय सीमाशुल्क लक्ष्यीकरण केंद्र, विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय, मुंबई;

18. श्री ए. मुरली, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, चेन्नई झोनल युनिट;

19. श्री जोफी जोस, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, कोचीन झोनल युनिट;

20. श्री आर. गोविंदन, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, चेन्नई झोनल युनिट;

21.श्री रविंदर यादव, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, दिल्ली झोनल युनिट;

22. श्री रिवाज दोरजे, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालय, गुवाहाटी झोनल युनिट;

23. श्री संजय कुमार, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, दिल्ली झोनल युनिट;

24. श्री शैलेश वसावन नायर, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई झोनल युनिट;

25. श्री श्रीराम के. नेल्ली, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, बंगलोर झोनल युनिट;

26. श्री सिद्धार्थ चक्रवर्ती, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, कोलकाता झोनल युनिट;

27. श्री सुरेश डी. पी., वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, महसूल गुप्तचर संचालनालय, बंगलोर झोनल युनिट;

28. श्री व्ही. महेंद्रन, निरीक्षक, प्रधान आयुक्त कार्यालय, CGST कोईम्बतूर, चेन्नई विभाग;

29. श्री नवीन कुमार, निम्न विभाग लिपिक, महसूल गुप्तचर संचालनालय (मुख्यालय), नवी दिल्ली.

 

 

 

 

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893758) Visitor Counter : 160


Read this release in: English , Hindi , Urdu , Tamil , Telugu