कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्यान्न आणि कृषिसंघटनेच्या आंतरसरकारी तांत्रिक कार्यगटाच्या अन्न आणि शेतीसाठी अनुवंशिक पशु संसाधने या विषयावरील 12 व्या सत्रात भारताची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली

Posted On: 25 JAN 2023 2:24PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023


दिनांक 18-20 जानेवारी 2023 दरम्यान रोम येथे झालेल्या आंतर-सरकारी तांत्रिक कार्य गटाच्या (ITWG) नुकत्याच संपलेल्या 12 व्या सत्रात, भारताची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आणि आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रांचे यावेळी भारताने  प्रतिनिधित्व केले. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे (ICAR,पशु विज्ञान)उपमहासंचालक आणि राष्ट्रीय समन्वयक डॉ बी एन त्रिपाठी, यांनी या सत्राचे उपाध्यक्ष आणि समन्वयक म्हणून काम केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्यान्न आणि कृषिसंघटनेच्या, कमिशन ऑन जेनेटिक रिसोर्सेस फॉर फूड अँड अॅग्रीकल्चर (CGRFA) याद्वारे स्थापन झालेला हा  कार्यगट, तांत्रिक मुद्द्यांचे पुनरावलोकन करणे, आयोगाला सल्ला देणे आणि शिफारसी करणे आणि जागतिक स्तरावर अन्न आणि शेतीसाठी अनुवंशिक पशु संसाधने (ANGR) याविषयी संबंधित आयोगाच्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे कार्य करते.

आंतर-सरकारी तांत्रिक कार्य गटाच्या(ITWG) 12 व्या सत्रात, प्राणी अनुवांशिक संसाधनांसाठी जागतिक कार्यान्वयन प्रणालीची (ग्लोबल प्लॅन ऑफ अॅक्शन) अंमलबजावणी, एएनजीआर  मधील (AnGR) विविधतेचे निरीक्षण करणे, तसेच तिसरा देशनिहाय नोंदींचा आढावा घेण्यात आला.रवंथ करणाऱ्या गटातील प्राण्यांच्या पचनाशी संबंधित सूक्ष्मजीवांची भूमिका, वातावरणातील बदल कमी करण्यात आणि जुळवून घेण्यामध्ये अनुवांशिक संसाधनांची भूमिका यावर पुढील धोरणावर आधारित मुद्दे;एएनजीआर (AnGR) साठी प्रवेश आणि लाभ-वाटप;  डिजिटल अनुक्रम माहिती आणि अनुवांशिक संसाधनांच्या संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी संभाव्य परिणाम अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

आयटीडब्ल्यूच्या  (ITWG) सत्रापूर्वी, एफएओच्या(FAO) मुख्यालयात 16-17 जानेवारी, 2023 दरम्यान जागतिक राष्ट्रीय समन्वयकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेत डॉ बी एन त्रिपाठी यांनी देशांतर्गत प्राणी विविधता – माहिती प्रणाली (DAD) मधील डेटा अद्ययावत करताना देशात आलेला  अनुभव सामायिक केला तसेच आयएस -आणि जातीची नोंदणी, अधिसूचना प्रणाली इत्यादींसह जर्मप्लाझम क्रायोप्रिझर्वेशनसाठी राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि एसडीजी  निर्देशकांची पूर्तता करण्यासाठी नॉन-डिस्क्रिप्ट एएनजीआरचे दस्तऐवजीकरण करून मूळ लोकसंख्येचा अनुक्रम तयार करण्यासाठी केलेल्या रचनेचा आराखडा  सादर केला,ज्याची उपस्थित सदस्यांनी प्रशंसा केली.


G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893577) Visitor Counter : 202


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil , Telugu