संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिन संचलन 2023: पाळत ठेवणे, संप्रेषण आणि धोक्यांना नष्ट करणे यावरील चित्ररथाचे डीआरडीओ करणार सादरीकरण; स्वदेशी बनावटीचा चाके असलेला संरक्षक मंचही यावर असेल

Posted On: 24 JAN 2023 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023

 

अत्याधुनिक संरक्षण प्रणाली विकसित करण्याच्या आपल्या ध्येयाबरहुकुम, संरक्षण, संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) 26 जानेवारी 2023 रोजी कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात एक चित्ररथ आणि एक उपकरण प्रदर्शित करणार आहे. प्रभावी पाळत, संप्रेषण आणि धोके निष्क्रीय करणे या माध्यमातून राष्ट्राची सुरक्षा ही डीआरडीओच्या चित्ररथाची पहिली संकल्पना आहे. चित्ररथाचे चार भाग केले आहेत. पहिल्या भागात पाण्याखाली पाळत ठेवणाऱ्या मंचाचे सादरीकरण केले आहे. यात पाणबूडीसाठीचे उशूज-2 सोनार, जहाजांसाठीचे हुमसा मालिकेतील सोनार आणि  हेकॉप्टरमधून पाळत ठेवण्यासाठी कमी फ्रिक्वेन्सीचे डंकींग सोनार यांचा समावेश आहे. या चित्ररथाच्या दुसऱ्या भागात डी4 काउंटर ड्रोन प्रणालीच्या माध्यमातून भूभागावर ठेवली जाणारी पाळत, संप्रेषण आणि धोके निष्क्रीय करणे दाखवले आहे. ते रिअल टाईम शोध, तपासणी, माग काढणे आणि लक्ष्य निष्क्रीय करणे साध्य करु शकतात. चित्ररथाच्या तिसऱ्या भागात, हवाई पाळत, संप्रेषण प्रणाली, धोक्याची आधीच सूचना देणारी आणि नियामक पद्धती (एईडब्लूअँडसी) तसेच तापस बीएच मध्यम अल्टीट्यूड लॉंग एन्ड्युरंस (मेल) युएव्ही दाखवली आहे.

सर्वात शेवटी, चौथा भाग असून, डीआरडीओच्या संशोधन उपक्रमांचे तो प्रतिनिधित्व करत आहे. यात सेमीकंडक्टर संशोधन आणि विकास सुविधेचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे. या भागात, डीआरडीओने सेमी-कंडक्टर, डिटेक्टर आणि नेक्स्टजेन सेन्सर्सच्या क्षेत्रातील भविष्यवेधी तंत्रज्ञानाचे चित्रणही केले आहे.

स्वदेशी-बनावटीचा चाके असलेला संरक्षक मंच (डब्लूएचएपी), 70-टन ट्रेलरवरील चाकांचा मॉड्यूलर 8X8 लढाऊ मंच वास्तविक उपकरणांच्या रूपात डीआरडीओद्वारे प्रदर्शित केला जाईल.

 

 

 

 

 

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893334) Visitor Counter : 223


Read this release in: English , Urdu , Hindi