पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परिक्षा पे चर्चा स्पर्धेतील विजेत्यांचा भूपेंद्र यादव यांच्या हस्ते सत्कार; हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी मुलांनी पर्यावरणस्नेही सवयी अवलंबण्याचे केले आवाहन


लाइफ अभियानामागील भावना अंगीकारण्यासाठी मुलांना केले प्रोत्साहित

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2023 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2023

 

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या  अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गीक इतिहास संग्रहालयाने युरो इंटरनॅशनल स्कूल, सेक्टर 109, गुरुग्राम यांच्या सहकार्याने  “जल है तो कल है-मिशन लाइफ” या विषयावर परिक्षा पे चर्चा या संदर्भात  चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. गुरुग्राममधील 30 शाळांमधील 732 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली.केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या स्पर्धेतील; विजेत्यांचा सत्कार केला आणि हवामान बदलाच्या समस्येवर  मात करण्यासाठी  पर्यावरणस्नेही सवयी अवलंबण्याचे आवाहन त्यांनी मुलांना केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले “एक्झाम वॉरियर्स ” हे पुस्तक प्रतीकात्मक  भेट म्हणून देण्यात आले.

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1893130) आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Urdu