आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी-20 भारत आरोग्यविषयक ट्रॅक


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी केरळमधील तिरूवनंतपुरम येथे आयोजित जी-20 आरोग्यविषयक कार्यकारी गटाच्या पहिल्या बैठकीत वैद्यकीय मूल्य प्रवास या विषयावरील उद्‌घाटनपर सत्राला केले संबोधित

“वैद्यकीय मूल्य पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक अंमलबजावणीला वेग मिळणे आवश्यक”

Posted On: 19 JAN 2023 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2023

 

आरोग्यम परमं भाग्यं, स्वास्थ्यं सर्वार्थ साधनम् म्हणजे उत्तम आरोग्य लाभणे हे सर्वात मोठे भाग्य आहे आणि आरोग्य हा जगातील सर्व सुखे प्राप्त करण्याचा मार्ग आहे या तत्वज्ञानावर भर देत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या, जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाअंतर्गत, आपण सर्वांना आरोग्यसुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच संपूर्ण जगात आरोग्य सेवांच्या उपलब्धतेतील असमानता कमी करण्याच्या उद्देशाने आराखडा तयार करण्यात मदत करण्यासाठी नियोजन करत आहोत. मूल्याधारित आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीचा वेग वाढवण्यासाठी तसेच जागतिक पातळीवर एकसमान आरोग्य सुविधा संरक्षण प्रदान करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांचा वेग वाढविण्याची कल्पना भारताने मांडली आहे. भारताकडे यावर्षी असलेल्या जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाअंतर्गत, आरोग्यविषयक कार्यकारी गटाच्या पहिल्या बैठकीनिमित्त ‘वैद्यकीय मूल्य पर्यटन’ या विषयावर आज नवी दिल्ली येथे आयोजित सत्राचे उद्घाटन करताना बोलत होत्या. नीती आयोगातील आरोग्य विषयाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

वैद्यकीय मूल्य पर्यटन या विषयाचे महत्त्व अधोरेखित करत डॉ.पवार म्हणाल्या की, गेली अनेक शतके पारंपरिक औषधांनी जगभरातील समुदायांमध्ये आरोग्याला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि अजूनही ही औषधे अनेक व्यक्तींसाठी पहिला मदतीचा हात आणि उपचाराचा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहेत. पारंपरिक औषधांच्या व्यापक स्वीकृतीवर अधिक भर देत त्या म्हणाल्या की वेदनेच्या व्यवस्थापनाचे प्रभावी साधन म्हणून पारंपरिक औषधोपचार पद्धतीला जगभरात मान्यता मिळत आहे आणि प्रतिजैविकांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर देखील या औषध योजनेकडून अधिकच अपेक्षा आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या 194 सदस्य देशांपैकी 170 पेक्षा अधिक देशांनी देखील पारंपरिक औषधोपचाराचा वापर करत असल्याची माहिती दिली आहे.

सर्वांगीण आरोग्य आणि आरोग्य सेवेसाठी एक अभिनव व्यवस्था निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे डॉ. पवार यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या की सर्वोत्तम आधुनिक आणि पारंपरिक औषधांचा उपचारामध्ये समन्वय साधण्यात भारत सक्षम आहे. त्याचबरोबर आपली आरोग्य प्रणाली असे दर्जेदार उपचार देते, ज्याची व्यापक उपलब्धता आहे आणि ती जगात सर्वात परवडण्याजोगी आहे. डॉ. पवार यांनी सहभागींना मूल्याधारित आरोग्यसेवेचा प्रचार करण्यासाठी  प्रोत्साहन दिले. डॉ. पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी आरोग्य आणि परवडण्याजोगा वैद्यकीय प्रवास  विषयक स्टॉललाही भेट दिली. 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी, सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात परवडण्याजोग्या वैद्यकीय पर्यटनाचे (वैद्यकीय मूल्य पर्यटन)  महत्त्व सांगितले. आरोग्यसेवा ही ‘सेवा’ असल्याच्या भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानाचा, आणि सर्वे संतु निरामया (जगात सर्वजण निरोगी राहोत) या संस्कृत म्हणीचा पुनरुच्चार करत, सर्वांसाठी "चांगले आरोग्य आणि निरामयता " आणि "सार्वत्रिक  आरोग्य सेवा" सुनिश्चित करण्याचे शाश्वत विकासाचे समान उद्दिष्ट  गाठण्याच्या दिशेने सर्व भागधारकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. 

आयुष मंत्रालयाचे सचीव राजेश कोटेचा, सचीव (आरोग्य संशोधन विभाग) डॉ. राजीव बहेल आणि अतिरिक्त सचीव (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय) लव अगरवाल यांच्यासह केंद्रसरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

R.Aghor/Sanjana/Rajashree/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1892343) Visitor Counter : 175