दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ‘भारतातील सबमरीन केबल लँडिंगसाठी परवाना रूपरेषा आणि नियामक यंत्रणा’ या विषयावरील सल्लापत्रावरील टिप्पण्या/प्रति-टिप्पण्या प्राप्त करण्यासाठी कालमर्यादा वाढवली आहे.

प्रविष्टि तिथि: 19 JAN 2023 9:43AM by PIB Mumbai

ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने  23 डिसेंबर 2022 रोजी ‘भारतातील सबमरीन केबल लँडिंगसाठी परवाना रूपरेषा आणि नियामक यंत्रणा’ या विषयावरील सल्लापत्र जारी केले होते.  प्राधिकरणाने भागधारकांकडून सल्लामसलत पत्रामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर टिप्पण्या प्राप्त करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2023 आणि प्रति-टिप्पण्यांसाठी 03 फेब्रुवारी 2023 ही अंतिम तारीख निश्चित केली होती.

 काही भागधारकांनी टिप्पण्या/प्रति-टिप्पण्या  देण्यासाठीची कालमर्यादा आणखी वाढविण्याची मागणी केल्याने लेखी टिप्पण्या आणि प्रति-टिप्पण्या सादर करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 10 फेब्रुवारी 2023 आणि 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पण्या/प्रति-टिप्पण्या शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरुपात advbbpa@trai.gov.in वर आणि त्याची प्रत jtadvbbpa-1@trai.gov.in वर पाठवावी. या ईमेल आयडी वर पाठवाव्यात. या संदर्भातील अधिक स्पष्टीकरण अथवा माहितीसाठी ,ट्रायचे ब्रॉडबँड आणि धोरण विश्लेषण सल्लागार, संजीव कुमार शर्मा, यांच्याशी +91-11-23236119 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 ***


Shailesh P/BS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 1892145) आगंतुक पटल : 225
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu