भारतीय निवडणूक आयोग
लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील एका लोकसभा मतदारसंघात आणि अरुणाचल प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमधल्या विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार
Posted On:
18 JAN 2023 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023
निवडणूक आयोगाने लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील 1 (एक) लोकसभा मतदारसंघात आणि अरुणाचल प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या खालील विधानसभा मतदारसंघातील 6 (सहा) रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे-
महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ मतदारसंघाची आणि लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे.
Sl.
No.
|
Name of State/UT
|
Parliamentary
/Assembly Constituency No. & Name
|
Reason for vacancy
|
1.
|
UT of Lakshadweep
|
Lakshadweep (ST) PC
|
Disqualification of Shri Mohammed
Faizal P.P.
|
2.
|
Arunachal Pradesh
|
01-Lumla(ST) AC
|
Death of Shri Jambey Tashi
|
3.
|
Jharkhand
|
23-Ramgarh AC
|
Disqualification of Smt. Mamta Devi
|
4.
|
Tamil Nadu
|
98-Erode (East) AC
|
Death of Shri Thiru
E. Thirumahan Everaa
|
5.
|
West Bengal
|
60-Sagardighi AC
|
Death of Shri Subrata Saha
|
6.
|
Maharashtra
|
215-Kasba Peth AC
|
Death of Smt. Mukta Shailesh Tilak
|
7.
|
Maharashtra
|
205-Chinchwad AC
|
Death of Shri Laxman Pandurang Jagtap
|
Schedule for Bye-election for Parliamentary/Assembly Constituency
|
Poll Events
|
Schedule
|
Date of Issue of Gazette Notification
|
31st January, 2023 (Tuesday)
|
Last Date of Nominations
|
7th February, 2023 (Tuesday)
|
Date for Scrutiny of Nominations
|
8th February, 2023 (Wednesday)
|
Last Date for Withdrawal of candidatures
|
10th February, 2023 (Friday)
|
Date of Poll
|
27th February, 2023 (Monday)
|
Date of Counting
|
2nd March, 2023 (Thursday)
|
Date before which election shall be completed
|
4th March, 2023 (Saturday)
|
पोटनिवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
या पोटनिवडणुकीसाठी येत्या 31 जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल.
पोटनिवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
उमेदवारी अर्जाची छाननी 8 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.
10 फेब्रुवारी 2023 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारी , 2023 रोजी मतदान होणार आहे.
या पोटनिवडणुकीची मतमोजणी 2 मार्च, 2023 रोजी होईल.
आदर्श आचारसंहिता
दिनांक 29 जून 2017 रोजी जारी केलेल्या आयोगाच्या निर्देश क्रमांक 437/6/1एनएसटी T/2016-सीसीएस नुसार (आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध)., आंशिक फेरबदलाच्या अधीन राहून ज्या जिल्ह्यात (जिल्ह्यांमध्ये) निवडणुक होत असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण किंवा कोणताही भाग समाविष्ट आहे,त्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू होईल
पोटनिवडणुकीदरम्यान कोविड संबंधित व्यवस्था
देशभरातील कोविडच्या परिस्थितीतीतील एकंदर सुधारणा लक्षात घेता आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण/राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे डीएम कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक उपाय मागे घेतल्याच्या अनुषंगाने, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान, चाचणी-मागोवा -उपचार -लसीकरण आणि कोविड प्रतिबंधासाठी सुयोग्य वर्तनाचे पालन या पंचसूत्रीच्या रणनीतीवर सातत्याने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जिल्हा यंत्रणेने कोविड परिस्थितीवर प्रभावीपणे लक्ष ठेवावे आणि आवश्यक कायदेशीर/प्रशासकीय निकष ठरवून कोविड प्रतिबंधासाठी सुयोग्य वर्तनासाठी नियम लागू करावेत.
निवडणूक आयोजित करण्यासाठी आयोगाने ऑक्टोबर, 2022 मध्ये 14.10.2022 रोजी कोविड, प्रतिबंधासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आयोगाच्य https://eci.gov.in/files/file/14492-covid-guidelines-for-general- electionbye-elections-to-legislative-assemblies-reg/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892052)
Visitor Counter : 304