विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
"भारताचे वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित पारंपरिक ज्ञान समाजापर्यंत पोहोचवणे" (SVASTIK) यासाठी भारतीय स्थापत्यशास्त्रीय वारसा उप-समितीची पहिली बैठक संपन्न
Posted On:
14 JAN 2023 9:11PM by PIB Mumbai
"भारताचे वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित पारंपरिक ज्ञान समाजापर्यंत पोहोचवणे (स्वस्तिक)" या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून सीएसआयआर -एनआयएससीपीआर (CSIR-NIScPR) ने 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय स्थापत्यशास्त्रीय वारसा उपसमितीची पहिली बैठक आयोजित केली होती. उप -समितीचे सदस्य तसेच सीएसआयआर –एनआयएससीपीआरचा चमू या बैठकीला उपस्थित होता. उप-समितीच्या सदस्यांनी गेल्या वर्षभरातील स्वस्तिक उपक्रमाच्या प्रगतीची प्रशंसा केली. बैठकीत उपस्थितांनी गृहनिर्माण, पाणी वाटप प्रणाली आणि नागरी वस्त्यांशी संबंधित प्राचीन पद्धतींचा प्रसार करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या. वास्तुशास्त्राच्या वैज्ञानिक प्रमाणीकरणाच्या निकषांवरही चर्चा करण्यात आली. समितीच्या सदस्यांनी भारताच्या स्थापत्य इतिहासाबद्दल एक संवाद मालिका आयोजित करण्याची सूचना केली. इंडियन जर्नल ऑफ ट्रॅडिशनल नॉलेजने स्थापत्यशास्त्र वारसा या विषयावर विशेष अंक प्रकाशित करण्याचा विचार करावा असेही यावेळी सुचवण्यात आले. स्वस्तिकची माहिती शिक्षकांसोबत सामायिक केली जावी आणि पारंपरिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी वर्गात सांगितली जावी अशी शिफारसही समितीने केली. याशिवाय, पारंपरिक ज्ञान संबंधी काम करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधावा आणि स्वस्तिकची माहिती संकलित करण्यासाठी त्यांचे शोधनिबंध आणि प्रबंध याची माहिती जाणून घ्यावी अशी सूचनाही करण्यात आली. स्वस्तिकच्या माहितीसाठी सूचना आणि सामग्री पुरवण्याची जबाबदारी समितीच्या सदस्यांवर सोपवण्यात आली.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891298)
Visitor Counter : 188