राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि पोंगलच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभेच्छा

Posted On: 12 JAN 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023

 

लोहरी (जी 13 जानेवारी 2023 रोजी येते) मकर संक्रांती, माघ बिहू आणि पोंगल (जे 14 जानेवारी 2023 रोजी येतात) या  सणांच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि पोंगल या सणांच्या शुभ मुहूर्तावर, मी देशवासीय आणि अनिवासी भारतीयांना शुभेच्छा देते.

हे सण भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक आहेत आणि आपल्या संस्कृतीचे वाहक आहेत. ते वेगवेगळ्या प्रदेशात विविध स्वरूपात साजरे केले जातात परंतु त्यांचा उद्देश सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाची भावना मजबूत करणे हा आहे. हे सण साजरे करून आपणही निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

या सर्व सणांनी भारतातील विविध समुदायांना प्रेम, सौहार्द आणि आपुलकीच्या बंधनात बांधावे तसेच सर्वांना आनंद मिळावा आणि सगळ्यांची भरभराट होवो  अशी मी कामना करते .

 Please click here to see the President's message - 

 

 

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1890854) Visitor Counter : 191


Read this release in: English , Urdu , Manipuri