वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

मार्गदर्शकांना मार्गदर्शन : स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताहात स्टार्टअप कंपन्यांना मार्गदर्शन करणाऱ्या उद्योगधुरीणांसाठी मास्टरक्लासचे आयोजन

Posted On: 12 JAN 2023 7:41PM by PIB Mumbai

मुंबई, 12 जानेवारी 2023

 

16 जानेवारी. याच दिवशी भारतात, स्टार्टअप इंडिया  अभियानाची सुरुवात झाली. हा दिवस आपण राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा करतो.

भारतीय स्टार्टअप व्यवस्थेची चैतन्यपूर्ण वाटचाल आणि ह्या अभियानाचा स्थापना दिन साजरा करण्यासाठी, 10 जानेवारी ते 16 जानेवारी ह्या काळात स्टार्ट अप इंडिया सप्ताह साजरा केला जातो. या अनुषंगाने,विविध कार्यशाळा, क्षमता बांधणी सत्रे, आणि कार्यक्रम स्टार्ट अप इंडियाने आयोजित केले होते. प्रत्येक सत्र देशातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या एका संकल्पनेवर आधारित होते. एन्टर मार्ग (MAARG-मार्गदर्शन, सल्लागार,सहकार्य, लवचिकता आणि विकास) हा मंच देशातील उद्यमशीलतेला आणि उद्यमशीलतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला पाठबळ देणारा हा एक सशक्त मंच आहे.

मार्ग (MAARG)- हा राष्ट्रीय मंच, विविध क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांना मार्गदर्शन देणारा, विविध कार्ये, विविध पातळ्यांवर, विविध भौगोलिक प्रदेश आणि क्षेत्रात कार्यरत स्टार्टअप्स ना आवश्यक ती सर्व मदत आणि मार्गदर्शन एकाच छताखाली मिळवून देणारा एक मंच आहे.

या साप्ताहिक उत्सवाचा एक भाग म्हणून, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील उद्योजकता, उद्योग प्रोत्साहन विभाग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT) च्या, क्षेत्रीय स्टार्टअप्स इंडियाद्वारे, उद्या म्हणजेच 13 जानेवारी 2023 रोजी MAARG वर मार्गदर्शक मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत फोर्ट भागात .जे. टॉवर्स (बीएसई बिल्डिंग), दलाल स्ट्रीट इथे 25व्या मजल्यावर, दुपारी 3.00 ते 5:30 पर्यंत हा मास्टरक्लास होणार आहे.

वैयक्तिकरित्या उपस्थित राहणाऱ्या मार्गदर्शकांव्यतिरिक्त, बाहेरगावचे मार्गदर्शक देखील या सत्रात आभासी माध्यमातून सामील होऊ शकतील.

उपस्थितांना त्यांच्या क्षमता आणि ज्ञान वाढवून स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्यासाठी प्रभावी मार्गांनी सुसज्ज करणे हा कार्यशाळेचा उद्देश आहे. उद्योग क्षेत्रात कौशल्य मिळवलेले दिग्गज मार्गदर्शकांना मार्गदर्शन करतील.

  • प्रभावी मार्गदर्शनासाठी रचनात्मक चौकटीबद्दल बीहाइव्ह कॅपिटलचे संस्थापक भूषण गजरिया मार्गदर्शन करतील
  • फंड एनेबलचे विक्रांत पोतनीस भांडवल उभारणीसाठी मदत करणे यावर बोलतील
  • संस्थापकांना मार्गदर्शकांकडून काय अपेक्षा आहेत यावर सीआयबीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मेनन यांची पॅनेल चर्चा

MAARG चे मार्गदर्शक तसेच इच्छुक मार्गदर्शकांना मास्टरक्लासमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.

स्टार्टअप इंडिया

स्टार्टअप इंडिया म्हणजे काय? तर हा एक प्रमुख उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश स्टार्टअप संस्कृतीला उत्प्रेरित करणे तसेच भारतातील नवकल्पना आणि उद्योजकतेसाठी एक मजबूत आणि सर्वसमावेशक परिसंस्था तयार करणे हा आहे. 2016 मध्ये प्रारंभ झाल्यापासून स्टार्टअप इंडिया उपक्रमाने उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी, एक मजबूत स्टार्टअप परिसंस्था तयार करण्यासाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांऐवजी  रोजगार निर्माती करणारा देश म्हणून  भारताचे रूपांतर करण्यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. या  कार्यक्रमांचे व्यवस्थापन एका समर्पित स्टार्टअप इंडिया टीमद्वारे केले जाते तर  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग या कार्यक्रमांची अंमलबजावणी करतो.

 

 

 

 

 

 

S.Kane/Radhika/Prajna/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1890809) Visitor Counter : 123


Read this release in: English , Urdu , Hindi