सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) 19 वी बैठक
राणे यांनी जागतिक उद्योजकता देखरेख (जीईएम ) भारत अहवाल 2021-22 केला प्रकाशित आणि औपचारिकीकरण प्रकल्पाचा केला प्रारंभ
Posted On:
11 JAN 2023 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय एमएसएमई मंडळाची (एनबीएमएसएमई ) ची 19 वी बैठक झाली. एमएसएमई राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यावेळी उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी आणि इतर प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे यांनी जागतिक उद्योजकता देखरेख (जीईएम ) भारत अहवाल 2021-22 जारी केला आणि औपचारिकीकरण प्रकल्पाचा प्रारंभ केला. एमएसएमई मंत्रालयाने भारतीय लघु उद्योग विकास बँकेसोबत औपचारिकीकरण प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या बैठकीत चर्चेदरम्यान, 14 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय एमएसएमई मंडळाच्या 18 व्या बैठकीच्या इतिवृत्तांताला मंजुरी देण्यात आली. 18 व्या बैठकीतील एमएसएमई मंत्रालयाशी संबंधित सर्व शिफारशी लागू करण्यात आल्याचे कृती अहवालात दिसून आले. एमएसएमईशी संबंधित विविध मुद्यांवर म्हणजेच एमएसएमई क्षेत्राचे औपचारिकीकरण आणि पतपुरवठा समस्या,एमएसएमई क्षेत्रातील कामगिरी आणि वेग वाढवणे (आरएएमपी) यासंदर्भात अंमलबजावणी आणि एमएसएमई क्षेत्राची परिभाषा यासंदर्भात मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानावरून राणे यांनी सभासदांनी केलेल्या सर्व बहुमूल्य सूचनांचा योग्य तो विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1890480)
Visitor Counter : 183