राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या उद्या होणाऱ्या समारोप सत्राला राष्ट्रपती उपस्थित राहणार, प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार करणार प्रदान

Posted On: 09 JAN 2023 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2023

 

मध्य प्रदेशात इंदोर येथे सुरु असलेल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या उद्या, 10 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या समारोप सत्रामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण देखील होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने भारतात उपस्थित असलेले सुरीनाम प्रजासत्ताकाचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी आणि गयाना सहकारी प्रजासत्ताकाचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1889883) Visitor Counter : 187


Read this release in: English , Kannada , Urdu