युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज इंदूरमध्ये सुरू झालेल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या पूर्ण सत्राला केले संबोधित
Posted On:
08 JAN 2023 11:02PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज इंदूर येथे ३ दिवसीय प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या पूर्ण सत्राला संबोधित केले. संमेलनाचा आजचा पहिला दिवस, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानामध्ये अनिवासी भारतीय युवकांची भूमिका या संकल्पनेसह युवा प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
“युवा प्रवासी भारतीय दिवस हा केवळ स्वतःची मुळे शोधण्यासाठी नाही तर आपल्याला भारतीय बनवणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे मूळ शोधण्यासाठी आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. ती तुमची कथा आहे तशीच उदयोन्मुख भारताची देखील कथा आहे. पुन्हा संबंध जोडण्याचा आणि नवीन शक्यतांची नव्याने कल्पना करण्याचा हा क्षण आहे.” असेही ते म्हणाले.
“आज मी व्यावहारिकता आणि आत्मविश्वासाच्या भावनेने सांगतो की, भारतातील तसेच भारतीय समुदायातील तरुणांनी तंत्रज्ञान, व्यवसाय, राजकारण, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात जगात उल्लेखनीय प्रगती केली आहे." असे ठाकूर यांनी सांगितले.
“भारतीय मग ते मायदेशी असो किंवा परदेशात, त्यांनी नेहमीच आपली मान उंच ठेवली आहे आणि आपले अंतःकरण खुले ठेवून पुढाकार घेत जगाला धाडसी आणि उज्ज्वल भविष्याकडे नेले आहे, अशा शब्दांत त्यांनी युवकांचा गौरव केला. मी तुम्हाला भारतात नावीन्यपूर्ण संशोधनासाठी , गुंतवणूक करण्यासाठी आणि तुमच्या कल्पनांना मूर्त रूप देण्यास प्रारंभ करण्यासाठी आमंत्रित करतो” असे ते म्हणाले.
“तुम्ही भारतातून भारतीयाला बाहेर काढू शकता, परंतु तुम्ही भारतीयांमधून भारतीयत्व बाहेर काढून टाकू शकत नाही. भारताची रुची, संगीताची लय आणि समुदायाच्या हृदयाची स्पंदने नेहमीच भारतासाठी आहेत. म्हणूनच प्रवासी भारतीय तरुण त्यांच्या पालकांच्या भूमीत योगदान देऊ इच्छितात, असे ठाकूर यांनी अनिवासी तरुणांसाठी सरकारचा दृष्टीकोन स्पष्ट करताना सांगितले.
संमेलनाच्या 17 व्या आवृत्तीची संकल्पना 'भारतीय समुदाय : अमृत काळात भारताच्या प्रगतीसाठी विश्वसनीय भागीदार' अशी आहे.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889654)
Visitor Counter : 230