सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2022-23 मधील राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला अंदाज

Posted On: 06 JAN 2023 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आर्थिक वर्ष 2022-23 साठी स्थिर (2011-12) आणि सध्याच्या किंमती या दोन्ही राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला आगाऊ अंदाज (FAE) जारी करत आहे.

2. वर्ष 2016-17 मध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी आवश्यक इनपुट म्हणून सादर झालेला सकल राष्ट्रीय उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज हा मर्यादित डेटावर आधारित आहे आणि बेंचमार्क-निदर्शक पद्धतीचा वापर करून संकलित केला  आहे, म्हणजे मागील वर्षातील उपलब्ध अंदाजाशी  (याठिकाणी 2021-22) सुसंगत क्षेत्रांची कामगिरी प्रतिबिंबित करणार्‍या संबंधित निर्देशकांचा वापर करून वर्तवला आहे.

3. येथे 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या वर्षांसाठी स्थिर (2011-12) आणि सध्याच्या किमती स्टेटमेंट1 ते 4 मध्ये दिल्या आहेत ज्या आर्थिक उपक्रम आणि जीडीपी खर्चाच्या घटकांनुसार मूळ किंमतींवर जीव्हीए सोबत सकल/निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाचा अंदाज वर्तवतात.

4.31 मे, 2022 रोजी जाहीर झालेल्या 2021-22 च्या जीडीपीच्या 147.36 लाख कोटी रुपयांच्या तात्पुरत्या अंदाजाच्या तुलनेत वास्तविक जीडीपी किंवा स्थिर (2011-12) किमतीनुसार जीडीपी वर्ष 2022-23 मध्ये अंदाजे 157.60 लाख कोटी रुपये आहे. 2021-22 मधील 8.7 टक्‍क्‍यांच्या तुलनेत 2022-23 मध्ये वास्तविक जीडीपी मधील वाढीचा अंदाज 7.0 टक्के आहे.

5. 31 मे, 2022 रोजी जाहीर झालेल्या 236.65 लाख कोटी रुपयांच्या 2021-22 या वर्षाच्या जीडीपी च्या तात्पुरत्या अंदाजाच्या तुलनेत, 2022-23 मध्ये सद्य किमतीवर जीडीपी 273.08 लाख कोटी रुपये असेल असा अंदाज आहे.

तथापि, हे 2022-23 चे प्रारंभिक अंदाज आहेत. सुधारित डेटा कव्हरेज, वास्तविक कर संकलन आणि अनुदानापोटी झालेला खर्च, स्त्रोत एजन्सीद्वारे केलेल्या डेटा सुधारणा इत्यादींची परिणती सुधारित अंदाजात होईल.

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1889306) Visitor Counter : 338


Read this release in: English , Urdu , Hindi