वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग 10 जानेवारी ते 16 जानेवारी 2023 दरम्यान ' स्टार्ट अप इंडिया नवोन्मेश सप्ताह' आयोजित करणार

Posted On: 06 JAN 2023 4:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी), भारतीय स्टार्टअप परिसंस्था  आणि राष्ट्रीय स्टार्टअप दिवस (16 जानेवारी 2023) साजरा करण्यासाठी, 10 जानेवारी 2023 ते 16 जानेवारी 2023 दरम्यान स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक अर्थात स्टार्ट अप इंडिया नवोन्मेश सप्ताहाचे आयोजन करत आहे.

स्टार्ट अप इंडिया नवोन्मेश सप्ताह 2023 मध्ये उद्योजक, महत्त्वाकांक्षी उद्योजक आणि इतर इच्छुकांसाठी प्रबोधनात्मक सत्रांचा समावेश असेल, ज्यामध्ये सरकारी अधिकारी, इनक्यूबेटर(नवीन सहभागी), कॉर्पोरेट्स आणि गुंतवणूकदार यासारख्या स्टार्टअप समुदायामधील संबंधित भागधारकांचा समावेश असेल.

याशिवाय, आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, देशभरातील स्टार्टअप समुदायाला सामावून घेऊन उद्योजकता आणि नाविन्यपूर्णतेची भावना जोपाण्यासाठी देशभरात 75 हून अधिक ठिकाणी स्टार्टअप संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांमध्ये महिला उद्योजकांसाठी विशेष कार्यशाळा, नव्याने सहभागी झालेल्यांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन कार्यशाळा, भागधारकांसाठी गोलमेज बैठका, परिषदा, क्षमता बांधणी कार्यशाळा, स्टार्टअप संबंधी माहिती देणारे परिसंवाद आदींचा समावेश आहे.

याशिवाय, 16 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनाचे औचित्य साधून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, स्टार्टअप इंडिया अंतर्गत एक प्रमुख उपक्रम असलेल्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2022 च्या विजेत्यांचा सत्कार समारंभ आयोजित करणार आहे.

स्टार्टअप इंडिया नवोन्मेश  सप्ताह 2023 चे उद्दिष्ट म्हणजे, 10 जानेवारी ते 16 जानेवारी 2023 दरम्यान देशभरातील स्टार्टअप समुदायाला, भागधारकांना एकत्र आणणे आणि  भारतात उद्योजकता आणि नवोन्मेशाची भावना वृद्धिंगत करणे हे आहे.

 

 

 

 

N.Chitale/V.Yadav/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1889160) Visitor Counter : 210