कोळसा मंत्रालय
डिसेंबर 2022 मध्ये भारताने 82.87 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य गाठले
एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळात देशात 607.97 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन
Posted On:
05 JAN 2023 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2023
भारताचे एकूण कोळसा उत्पादन डिसेंबर 2022 मध्ये वाढून 82.87 दशलक्ष टन (एमटी) वर पोहोचले. डिसेंबर 2021 च्या 74.79 मेट्रिक टन च्या तुलनेत यामध्ये 10.81% वाढ झाली आहे.
कोळसा मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये, कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ने कोळसा उत्पादनात 10.30% वाढ नोंदवली, तर एसीसीएल आणि कॅप्टिव्ह खाणी/इतरांनी अनुक्रमे 19.12% आणि 9.01% वाढ नोंदवली. 28 कोळसा खाणींनी 100% पेक्षा जास्त उत्पादन केले, तर चार खाणींची उत्पादन पातळी 80 ते 100% दरम्यान होती.
त्याच वेळी, कोळसा वितरण प्रमाण डिसेंबर 22 मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 5.28% ने वाढले आणि74.95 एमटी वरून 78.91 एमटी वर पोहोचले. डिसेंबर'22 मध्ये, सीआयएल, एसीसीएल आणि कॅप्टिव्ह खाणी/इतरांनी अनुक्रमे 62.72 एमटी, 6.72 एमटी आणि 9.46 एमटी कोळशाची पाठवणी करून 3.57%, 17.89% आणि 8.85% इतकी वाढ नोंदवली.
यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे, कोळशाचे उत्पादन एप्रिल-डिसेंबर 22 या कालावधीत 16.39% ने वाढून 607.97 एमटी वर पोहोचले. आर्थिक वर्ष 22 मध्ये याच कालावधीत ते 522.34 एमटी इतके होते. सीआयएल ने आर्थिक वर्ष 23 च्या डिसेंबर पर्यंत 479.05 एमटी कोळसा उत्पादन नोंदवले, आर्थिक वर्ष 22 मध्ये याच कालावधीत ते 413.63 एमटी इतके होते. यामधून 15.82% वृद्धी दिसून येते.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888987)
Visitor Counter : 192