वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आयआयजेएस सिग्नेचर आणि जीजेईपीसी ने 5 ते 9 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित केले इंडिया जेम अँड ज्वेलरी मशिनरी एक्स्पो


निर्यातीला चालना देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचे प्रतिपादन

Posted On: 05 JAN 2023 5:56PM by PIB Mumbai

मुंबई, 5 जानेवारी 2023

 

जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (जीजेईपीसी),अर्थात रत्ने आणि आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेने मुंबईमध्ये बॉम्बे एक्झिबिशन सेंटर इथे 5 ते 9 जानेवारी 2023 दरम्यान, 2023 या वर्षातील पहिले डिझाईन-केंद्रित दागिने प्रदर्शन- इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो (आयआयजेएस सिग्नेचर) आणि इंडिया जेम अँड ज्वेलरी मशिनरी एक्स्पो (आयजीजेएमई) आयोजित केले आहे.

आयआयजेएस सिग्नेचर 2023 च्या उद्‌घाटन समारंभाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि खासदार पूनम महाजन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, आयआयजेएस सिग्नेचरला नेहमीच समृद्ध वारसा लाभला असून,प्रदर्शनाची  ही ‘हरित’ आवृत्ती  खास आहे, कारण यामध्ये महिला उद्योजकांसाठी खास बूथ (केंद्र) आणि नवोदित ज्वेलरी डिझायनर्ससाठी (आभूषणकार) व्यासपीठ आहे. ई-कॉमर्सद्वारे रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीसाठी सुलभीकृत नियामक चौकटीची अंमलबजावणी, हिऱ्यांच्या आयातीवरील शुल्कात कपात, नवीन सुवर्ण मुद्रीकरण धोरण आणि हॉलमार्किंग मानदंड यासारखी अनेक पावले मंत्रालयाने उचलली आहेत. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.

जीजेईपीसी चे अध्यक्ष विपुल शाह म्हणाले की, हिरे, रत्ने आणि दागिन्यांमध्ये भारत जगाचे नेतृत्व करत आहे. आणि आयआयजेएस सिग्नेचर आणि आयजीजेएमई सारख्या अनेक उपक्रमांमुळे जीजेईपीसी ने भारतातील सर्वात सक्रीय ईपीसी होण्याचा मान मिळवला आहे. या वर्षीचे प्रदर्शन पूर्वीपेक्षा मोठे, अधिक चांगले आणि हरित (पर्यावरण पूरक) झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भारताच्या एकूण रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत 8.26% वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षाची शेवटची तिमाही अत्यंत महत्त्वाची आहे कारण या वर्षाचे 45.7 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे लक्ष्य गाठायचे असल्याने या काळात निर्यातीमध्ये मजबूत वृद्धीची  गरज आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी ईसीटीए आणि इंडिया युएई सीईपीए (मे 2022 मध्ये) अंतर्गत ऑस्ट्रेलियाबरोबरचे मुक्त व्यापार करार  कार्यान्वित केले आणि या वर्षी आणखी दोन मुक्त व्यापार करार  अपेक्षित आहेत.

आयआयजेएस सिग्नेचरचे 15 वे प्रदर्शन 65,000 चौरस फूट परिसरात आयोजित करण्यात आले आहे. आयआयजेएस सिग्नेचर प्रदर्शन 2,400 पेक्षा जास्त बूथवरील 1,300 पेक्षा प्रदर्शकांना सामावून घेईल. आयआयजेएस सिग्नेचर प्रदर्शनाला 10,000 स्थानिक कंपन्यांचे 32,000 अभ्यागत हजेरी लावतील. जीजेईपीसी ने प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या हिऱ्यांसाठी एक नवीन विभाग सादर केला आहे.    

    

आयजीजेएमई प्रदर्शनात 90 पेक्षा जास्त कंपन्या, 115 पेक्षा जास्त बूथ(केंद्रे) असून, ते एकाच वेळी @ 7 दालनांमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

यावर्षी आयआयजेएस सिग्नेचरमध्ये 50 देशांतील 600 कंपन्यांमधील 800 परदेशी पाहुण्यांचा विक्रमी सहभाग आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लड (युनायटेड किंगडम), मलेशिया, श्रीलंका, इराण, बांगलादेश, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात, बहारीन आणि रशिया या 10 देशांमधून शिष्टमंडळे आली आहेत. प्रथमच सौदी अरेबियातून 18 प्रमुख खरेदीदारांसह शिष्टमंडळ आले आहे.

आयआयजेएस सिग्नेचर 2023 मधील उत्पादन विभागांमध्ये हे समाविष्ट आहे: सोने आणि सुवर्ण सीझेड जडीत आभूषणेहिरे, रत्न आणि इतर जडावाचे दागिनेचांदीचे दागिने, कलाकृती आणि भेटवस्तू; सुटी रत्ने प्रयोगशाळा आणि शिक्षणआणि प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (सुटे आणि आभूषणे )

आयआयजेएस सिग्नेचर 2023 मधे या नवीन वैशिष्ट्यांचा समावेश आहे: इनोव्ह8 चर्चासत्र (Innov8 Talks), यात अनुभवात्मक विपणन, पर्यायी वित्तपुरवठा, इ. समावेश आहे. इनोव्ह8 लॉंचपॅड  (Innov8 LaunchPad) विशेष उत्पादन उद्घाटन क्षेत्र आहे. इनोव्ह8 हब

(Innov8 Hub) हा एक भविष्यवेधी तंत्रज्ञान विभाग आहे यात नव्या पिढीचे अॅप विकासक, कृत्रिम बुद्धिमत्ता ही वैशिष्ट्ये असतील.

सोहळा भव्य, उत्तम आणि पर्यावरणस्नेही करण्यासाठी जीजेईपीसी, सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आयआयजेएस सोहळा 2025-2026 पर्यंत पूर्णपणे कार्बन-मुक्त बनवण्याचे जीजेईपीसीचे उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. कोणताही अपव्यय टाळण्यासाठी आयआयजेएस सिग्नेचरमधील सर्व केन्द्र पूर्वनिर्मित आहेत. आयआयजेएस सिग्नेचरसाठी सौर आणि पवन उर्जेचा पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर रिन्यूएबल इनर्जी लिमिटेडची वीज वापरली जाणार आहे. वसुंधरेच्या संवर्धनासाठी, संकल्प तरू फाउंडेशनच्या सहकार्याने एक वसुंधरा हा उपक्रम जीजेईपीसी सुरू करत आहे. जीजेईपीसीने या उपक्रमांतर्गत एका वर्षात 50,000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदे बद्दल (जीजेईपीसी)

केन्द्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने (जीओएल) 1966 मध्ये स्थापन केलेली रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषद (जीजेईपीसी), देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केन्द्र सरकारने सुरू केलेल्या अनेक निर्यात प्रोत्साहन परिषदांपैकी (ईपीसी) एक आहे.  भारताच्या स्वातंत्र्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास आपल्या अर्थव्यवस्थेने त्यावेळी नुकतीच सुरुवात केली होती. जीजेईपीसीला 1998 पासून, स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे.  जीजेईपीसी ही रत्ने आणि आभूषण उद्योगाची शिखर संस्था आहे आणि ती आज या क्षेत्रातील 8500 सदस्यांचे प्रतिनिधित्व करते. मुंबईतील मुख्यालयासह, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, सुरत आणि जयपूर येथे जीजेईपीसीची प्रादेशिक कार्यालये आहेत. या उद्योगासाठी ही सर्व प्रमुख केंद्रे आहेत.  अशा प्रकारे याची व्याप्ती विस्तृत असून सदस्यांना थेट आणि अधिक अर्थपूर्ण पद्धतीने सेवा देण्यासाठी निकटतम संवाद साधण्यास ती सक्षम आहे.  गेल्या काही दशकांमध्ये, जीजेईपीसी सर्वात सक्रिय ईपीसीपैकी एक म्हणून उदयास आली आहे. आपल्या प्रचार प्रसाराची व्याप्ती विस्तारण्यासाठी तसेच सदस्यांना सर्वोत्तम  सेवा देण्याकरता ती सतत प्रयत्नशील आहे

 

N.Chitale/Rajashree/Vinayak/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888940) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi