रेल्वे मंत्रालय
गाझियाबाद- पंडित दीनदयाळ उपाध्याय विभाग (762 किमी) हा भारतीय रेल्वेचा सर्वात लांब पूर्ण स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग विभाग बनला
उत्तर मध्य रेल्वेमार्गावर, आर्थिक वर्ष 2022-23 (30 डिसेंबर 2022) मध्ये सुरु केलेले एकूण स्वयंचलित सिग्नल 139.42 रूटकिलोमीटर
रेल्वेच्या कार्यान्वयनात डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा मिळवण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे अवलंब
Posted On:
05 JAN 2023 1:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2023
भारतीय रेल्वेच्यादृष्टीने सध्या जास्त फेऱ्या असलेल्या मार्गांवर अधिक गाड्या चालवण्याची क्षमता वाढवण्यासाठी, स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग (एबीएस) हा एक किफायतशीर उपाय आहे. परिणामी भारतीय रेल्वेने स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 दरम्यान 268 रूट किलोमीटरवर एबीएस कार्यान्वित करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेच्या 3706 किमी मार्गावर 31.12.2022 पर्यंत, एबीएस सुरु केले आहेत. स्वयंचलित सिग्नलिंगच्या अंमलबजावणीमुळे, क्षमतेत वाढ होऊन रेल्वेची अधिक सक्षम सेवा शक्य होणार आहे.
रेल्वेच्या कार्यान्वयनात डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा मिळवण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जात आहे. 2022-23 मध्ये 347 स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली उपलब्ध करण्यात आली आहे. 2888 स्थानकांना 31.12.2022 पर्यंत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग उपलब्ध करण्यात आले आहे. यात, 45.5% भारतीय रेल्वे क्षेत्राचा समावेश आहे.
नुकतेच, प्रयागराज विभागातील सतनरैनी-रुंधी-फैजुल्लापूर स्थानक विभागात स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित केली आहे, तसेच 762 किमी लांब गाझियाबाद- पं. दीनदयाल उपाध्याय विभाग पूर्णपणे स्वयंचलित करण्यात आला आहे. तो भारतीय रेल्वेचा सर्वात लांब स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग विभाग बनला आहे.
सुवर्णा बेडेकर/विनायक घोडे/प्रि. मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888827)
Visitor Counter : 184