कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेच्या सुकाणू समितीची तिसरी बैठक


सर्व मंत्रालयांनी कौशल्य विकास प्रयत्नांमध्ये अधिक समन्वय निर्माण करण्याचे प्रधान यांचे आवाहन

Posted On: 04 JAN 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2023

 

प्रमुख मुद्दे:

  • कौशल्य विकास योजना, कौशल्य तफावत विश्लेषण आणि कौशल्य मॅपिंग, भारतीय तरुणांना जागतिक संधींशी जोडणे, उदयोन्मुख ट्रेंड प्रतिबिंबित करण्यासाठी अभ्यासक्रम विकसित करणे आणि कौशल्य विकासाशी संबंधित विविध पोर्टल्समध्ये समन्वय निर्माण करणे यावर केंद्रित चर्चा.

केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेच्या सुकाणू समितीची तिसरी बैठक झाली. कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. कौशल्य विकासाच्या प्रयत्नांमध्‍ये झालेली प्रगती आणि पुढील दिशेबद्दल प्रधान यांनी चर्चा केली.

कौशल्य विकास योजनांचे एकत्रीकरण, कौशल्यामधील तफावतीचे विश्लेषण आणि कौशल्य मॅपिंग, भारतीय तरुणांना जागतिक संधींशी जोडणे, उदयोन्मुख ट्रेंड प्रतिबिंबित करण्यासाठी अभ्यासक्रम विकसित करणे आणि कौशल्य विकासाशी संबंधित विविध पोर्टल्समध्ये समन्वय निर्माण करणे यासारख्या विविध मुद्द्यांवर मंत्र्यांनी चर्चा केली.

सर्व मंत्रालयांच्या कौशल्य विकास योजनांमध्ये अधिक समन्वय निर्माण करणे, सर्व भागधारकांद्वारे कौशल्य विकासावर खर्च करणे, कौशल्य विकास प्रयत्नांना बाजारपेठेतील वास्तविकतेशी जोडणे आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी जलद-ट्रॅकिंग अंमलबजावणीचे आवाहन त्यांनी केले.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888708) Visitor Counter : 193