कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोल इंडिया लिमिटेड आणि कामगार संघटनांदरम्यान कर्मचाऱ्यांना किमान हमी लाभाची शिफारस करणारा सामंजस्य करार


2.38 लाख बिगर-कार्यकारी कर्मचाऱ्यांना 19% किमान हमी लाभ (MGB)

Posted On: 04 JAN 2023 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2023

 

वेतन वाटाघाटीवरील गतिरोध मोडून कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि चार केंद्रीय कामगार संघटना बीएमएस, एचएमएस, एआयटीयूसी आणि सीआयटीयू यांनी 3 जानेवारी 2023 रोजी एक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे ज्यात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय कोळसा वेतन करार –XI (NCWA-XI) चा भाग म्हणून 2.38 लाख बिगर -कार्यकारी कर्मचाऱ्यांना 19% किमान हमी लाभाची (MGB) शिफारस केली आहे.

19% किमान हमी लाभ हा मूळ वेतन, परिवर्तनशील महागाई भत्ता, विशेष महागाई भत्ता आणि उपस्थिती बोनस धरून 30 जून 2021 पर्यंतच्या एकूण मिळकतीवर असेल.

या सामंजस्य करारावर तेलंगणास्थित सिंगरेनी कॉलीरीज कंपनी लिमिटेड (SCCL) ही अन्य स्वाक्षरी करणारी कंपनी आहे. 1 जुलै 2021 पर्यंत कंपनीच्या नावावर असलेल्या सीआयएल आणि एससीसीएल या दोन्ही सरकारी मालकीच्या कोळसा कंपन्यांचे सुमारे 2.82 लाख कर्मचारी लाभार्थी असतील. एससीसीएल चे कर्मचारी जवळपास 44,000 आहेत.

3 जानेवारी रोजी कोलकाता येथे CIL च्या कॉर्पोरेट मुख्यालयात झालेल्या कोळसा उद्योग-XI च्या संयुक्त द्विपक्षीय समितीच्या आठव्या बैठकीत ही शिफारस करण्यात आली.

एमजीबी व्यतिरिक्त उर्वरित मुद्द्यांवर विचारविनिमय झाल्यानंतर एनसीडब्ल्यूए च्या अकराव्या आवृत्तीसाठी 1 जुलै 2021 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी एका औपचारिक कराराविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल.

चार केंद्रीय कामगार संघटनांनी किमान हमी लाभाला सौहार्दपूर्णरित्या अंतिम स्वरूप देण्यात पुढाकार घेतला आहे. सीआयएलचे सुसंवादी औद्योगिक संबंध आहेत आणि संघटना देखील चालू आर्थिक उत्पादन लक्ष्य गाठण्याचे महत्त्व जाणत आहेत.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888664) Visitor Counter : 231


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu