आयुष मंत्रालय

देशात आयुर्वेद क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयुर्वेद क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ‘एसएमएआरटी’ कार्यक्रमाचे आयोजन


आयुर्वेदविषयक दर्जेदार संशोधनासाठी ‘एसएमएआरटी’ उपक्रमाच्या माध्यमातून नवे मार्ग खुले करण्याचा आयुष मंत्रालयाचा मानस

Posted On: 02 JAN 2023 5:47PM by PIB Mumbai

 

एनसीआयएसएम म्हणजेच भारतीय वैद्यकीय प्रणालीसाठीचा राष्ट्रीय आयोग आणि सीसीआरएएस अर्थात आयुर्वेद विज्ञानातील संशोधनासाठीचे केंद्रीय मंडळ या केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुक्रमे वैद्यकीय शिक्षणाचे नियमन करणे आणि वैद्यकीय संशोधन कार्य सुरु ठेवणे यासाठी कार्य करणाऱ्या प्रमुख संस्था आहेत. आयुर्वेद महाविद्यालये आणि रुग्णालये यांच्या माध्यमातून देशातील प्राधान्यक्रमाच्या आरोग्य सेवा संशोधन क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने या दोन संस्थांनी संयुक्तपणे एसएमएआरटीम्हणजेच शिक्षकी क्षेत्रातील आयुर्वेद व्यावसायिकांच्या मुख्य प्रवाहातील आयुर्वेदविषयक संशोधनाला वावहा कार्यक्रम सुरु केला आहे.

एनसीआयएसएमचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी आणि सीसीआरएएसचे महासंचालक प्रा.रवीनारायण आचार्य यांनी आज एनसीआयएसएमच्या आयुर्वेद मंडळाचे अध्यक्ष प्रा.बी.एस.प्रसाद तसेच आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात केली.

या उपक्रमाची प्रशंसा करून एनसीआयएसएमचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी म्हणाले, आयुर्वेदातील वैद्यकीय संशोधनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या कार्यक्रमात आहे असा विश्वास मला वाटतो. असे दिसून आले आहे की, आयुर्वेद क्षेत्रातील मोठ्या शिक्षक समुदायाची संशोधनविषयक क्षमता बहुतेकदा पुरेशा प्रमाणात वापरली जात नाही. म्हणूनच या  एसएमएआरटीकार्यक्रमाचा आयुर्वेदाच्या क्षेत्रावर सखोल, दीर्घकालीन आणि कायाकल्प घडवणाऱ्या प्रभाव दिसून येईल आणि ही फार मोठी देशसेवा असेल. हा उपक्रम सुरु केल्याबद्दल मी सीसीआरएएसचे अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी  एनसीआयएसएमकडून सर्वतोपरी पाठींबा दिला जाईल अशी ग्वाही देतो.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888152) Visitor Counter : 245