कोळसा मंत्रालय
कोळसा/लिग्नाइट सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांद्वारे खाण पर्यटनाला प्रोत्साहन
Posted On:
02 JAN 2023 7:44PM by PIB Mumbai
निसर्ग, समाज, जंगले आणि वन्यजीव यांच्याशी सुसंगत वाटचालीच्या प्रयत्नांत, कोळसा मंत्रालय साठे संपल्यानंतर, सुयोग्य खाण क्षेत्रांचे पर्यावरणस्नेही उद्याने, जलक्रीडा, भूमिगत खाण पर्यटन, गोल्फ मैदान, साहसी स्थळे, पक्षी निरीक्षण स्थळे इत्यादीत रूपांतर करते. या स्थळांमध्ये स्थानिक लोकांसाठी करमणूक, महसूल निर्मिती आणि रोजगारासाठी चांगली क्षमता आहे.
सिंगरौली येथील नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने विकसित केलेला मुडवानी धरण पर्यावरणपूरक उद्यान आणि मध्य प्रदेशातील डोला येथील साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने विकसित केलेला अनन्यावाटिका इको-रिस्टोरेशन पार्क कम पिट लेक ही अशा उपक्रमांची अनोखी उदाहरणे आहेत.
Entrance of Mudwani Dam Eco-Park
Walkways in Mudwani Dam Eco-Park
सिंगरौली येथील मुडवानी धरण पर्यावरणपूरक उद्यान, 84,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर वसलेले आहे आणि वृक्षारोपण अभियान 2021 दरम्यान त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक शांत ठिकाण आहे, तरीही शहराच्या गजबजाटापासून फार दूर नाही. विस्तृत परिसरातील मुडवानी धरण पर्यावरणपूरक उद्यानात सुंदर पाणवठे, पायवाटा, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, उपहारगृह आणि स्थानिक उत्पादनांची दुकाने विकसित करण्यात आली आहेत. उद्यानात विसावा आणि आरामासाठी केवळ तलाव दृष्टीपथात येईल असे आसन क्षेत्र विकसित केले गेले आहे. नेत्रदीपक मुडवानी धरण पर्यावरणपूरक उद्यानात वर्षाकाठी सरासरी 25,000 पर्यटक हजेरी लावतात. हे सभोवतालच्या हवेच्या शुद्धीकरणास, मातीची धूप रोखण्यास आणि पर्यावरणीय विकासास मदत करते.
"अनन्यावाटिका" इको-रिस्टोरेशन पार्क कम पिट लेक हे मध्य प्रदेशातील डोला येथील राजनगर ओपनकास्ट प्रकल्पाच्या सेक्टर "डी" मधून सोडलेल्या अतिरिक्त कचऱ्याच्या पुनर्वसनानंतर विकसित केले आहे. 50 एकर क्षेत्रात एक खड्डा-तलाव/जलसाठा आहे आणि 6 एकर क्षेत्रात उद्यान आहे. हे ओपन कास्ट खाण उत्खनन प्रकल्पातील पुनर्वसन आणि शाश्वत विकासाच्या सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक आहे. या उद्यानात विविध प्रकारची फळे देणारी/शोभेची/औषधी प्रकारच्या वनस्पती आहेत, ज्यात आंबा, जास्वंद, शोभिवंत पाम, मोसंबी, डाळिंब, पेर, आवळा, करवंद, मनुका, बांबू आणि इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे.
या पर्यावरणस्नेही उद्यानामुळे फळांनी लगडलेली झाडे आणि स्थलांतरित सायबेरियन क्रेन सारख्या विदेशी पक्षांना आकर्षित करून, जमिनीचे जैविक पुनर्संचयन आणि मृदा-स्थिरीकरणासह परिसराची पर्यावरणीय पुनर्स्थापना झाली आहे.
Glimpse of AnanyaVatika Eco-Park
Pit lake of AnanyaVatika Eco-Park
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888119)
Visitor Counter : 250