वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विरासत या साडी महोत्सवाचा दुसरा टप्पा : भारतातील हातमागावर विणलेल्या  75 साड्यांचा उत्सव उद्यापासून सुरू होत आहे


पारंपरिक विणकर जनपथ येथील हॅन्डलूम  हाट येथे हाताने विणलेल्या विविध प्रकारच्या साड्यांचे प्रदर्शन आणि विक्री करतील

Posted On: 02 JAN 2023 7:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीत जनपथ येथील हॅन्डलूम हाट येथे आयोजित "विरासत" या साडी महोत्सवाचा दुसरा टप्पा 3 ते 17 जानेवारी 2023 पर्यंत सुरू होईल

वस्त्रोद्योग मंत्रालय या महोत्सवाचे आयोजन करत असून प्रदर्शनाला भेट देण्यासाठी  सकाळी 11 ते रात्री 8 अशी वेळ आहे.

दुसऱ्या टप्प्यात देशातील विविध भागातील 90 हून अधिक विणकरांचा सहभाग असून  टाय आणि डाई, चिकन एम्ब्रॉयडरी साड्या, हँडब्लॉक साड्या, कलमकारी मुद्रित साड्या, अजराख, कांठा आणि फुलकरी यासारख्या हस्तकला केलेल्या प्रसिद्ध साड्यांचे प्रकार यात पहायला मिळतील. यामध्ये खास हातमाग साड्यांव्यतिरिक्त जामदानी, इकत, पोचमपल्ली, बनारस ब्रोकेड, टसर सिल्क (चंपा), बलुचारी, भागलपुरी सिल्क, टांगेल, चंदेरी, ललितपुरी, पटोला, पैठणी इत्यादी साड्या देखील असतील. याशिवाय तंचोई, जंगला, कोटा डोरिया, कटवर्क, माहेश्वरी, भुजोडी, संतीपुरी, बोमकाई आणि गरड कोरियाल, खंडुआ आणि आर्नी सिल्क साड्या यांसारख्या हॅण्डलूम साड्या देखील उपलब्ध असतील.  'विरासतहाताने विणलेल्या  75 भारतीय साड्यांचा उत्सव ', या हातमागावर विणलेल्या साड्यांच्या महोत्सवाचा पहिला टप्पा 16 डिसेंबर रोजी सुरू होऊन 30 डिसेंबर 2022 रोजी त्याची सांगता झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आणि राज्यमंत्रीदर्शना जरदोश आणि इतर महिला खासदारांच्या उपस्थितीत 16 डिसेंबर 2022 रोजी झाले होते.

16 ते 30 डिसेंबर 2022 दरम्यान झालेल्या या महोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात 70 स्पर्धकांनी विरासत मध्ये भाग घेतला. वृत्तपत्रे, पोस्टर्स, निमंत्रण पत्रिका समाज माध्यमं, मुद्रित माध्यमं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि डिझायनर्स कार्यशाळा इत्यादींद्वारे या कार्यक्रमाची जाहिरात करण्यासाठी व्यापक प्रचार कार्यक्रम हाती घेण्यात आला.  हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला आणि त्याला बहुतेक प्रत्येक वयोगटातील लोकांचा सहभाग मिळाला. याशिवाय या क्षेत्राकडे आवश्यक ते लक्ष वेधले गेले आणि हातमागाच्या वस्तूंच्या विक्रीमुळे विणकरांसाठी देखील तो लाभदायी ठरला.

आपल्या हातमाग विणकरांना पाठिंबा देण्यासाठी #MySariMyPride या सामायिक हॅशटॅग अंतर्गत समाजमाध्यमांवर एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या अनुषंगाने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 हातमाग विणकरांच्या हातमाग साड्यांचे प्रदर्शन-आणि-विक्रीचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांसाठी अनेक उपक्रमांची योजना आखण्यात आली आहे जसे की:

  • विरासत- वारसा साजरा करणे: जतन केलेल्या हातमाग साड्यांचे प्रदर्शन.
  • विरासत-एक धरोहर: विणकरांकडून साड्यांची थेट किरकोळ विक्री.
  • विरासत के धागे : हातमागाचे थेट प्रात्यक्षिक
  • विरासत-कल से कल तक: साडी आणि साड्यांचा टिकाऊपणा याबाबत चर्चा आणि कार्यशाळा.
  • विरासत-नृत्य संस्कृती: भारतीय संस्कृतीतील प्रसिद्ध लोकनृत्य.

सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. भारतातील काही अनोख्या ठिकाणांहून आणलेल्या हातमागाच्या साड्या प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यांची एक संक्षिप्त यादी खाली दिली आहे: -

 

States

Prominent sari varieties

Andhra Pradesh

Uppada Jamdhani Sari, Venkatagiri Jamdani Cotton Sari, Kuppadam Sari, Chirala Silk Cotton Sari, Madhavaram Sari and Polavaram Sari

Kerala

Balaramapuram Sari and Kasavu Sari

Telengana

Pochampally Sari, Siddipet Gollabamma Sari and Narayanpet Sari

Tamilnadu

Kancheepuram Silk Sari, Arni Silk Saris, Thirubuvanam Silk Sari, Vilandai Cotton Sari, Madurai Sari, Paramakudi Cotton Sari, Aruppukottai Cotton Sari, Dindigul Cotton Sari, Coimbatore Cotton Sari, Salem Silk Sari and Coimbatore (Soft) Silk Saris & Kovai Kora Cotton Saris

Maharashtra

Paithani Sari, Karvath Kathi Sari and Nagpur Cotton Sari

Chhattisgarh

Tussar Silk Sari of Champa

Madhya Pardesh

Maheshwari Sari and Chanderi Sari

Gujarat

Patola Sari, Tangaliya Sari, Ashawali sari and Kuchchi Sari/ Bhujodi sari

Rajsthan

Kota Doria Sari

Uttar Pradesh

Lalitpuri Sari, Banaras Brocade, Jangla, Tanchoi, Cutwork, and Jamdani

Jammu & Kashmir

Pashmina Sari

Bihar

Bhagalpuri Silk Sari and Bawan Buti Sari

Odisha

Kotpad Sari and Gopalpur Tassar  Sari

West Bengal

Jamdani, Santipuri and Tangail

Jharkhand

Tussar and Gichha Silk Sari

Karnataka

Ilkal Sari

Assam

Muga Silk Sari, Mekhla Chadar (Sari)

Punjab

Embd. & Croch (Phulkari)

या कार्यक्रमामुळे साडी विणण्याच्या जुन्या परंपरेवर पुन्हा लक्ष केंद्रित केले जाईल आणि त्याद्वारे हातमागावर काम करणाऱ्या समुदायाची कमाई सुधारेल.

हातमाग क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, याशिवाय मोठ्या संख्येने लोकांना, विशेषत: महिलांना रोजगार देणारे हे प्रमुख क्षेत्र आहे. हा कार्यक्रम हातमाग क्षेत्राची परंपरा आणि क्षमता या दोन्हींचा उत्सव पूर्ण ताकदीने साजरा करेल.

***

S.Patil/B.Sonatakke/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888113) Visitor Counter : 489


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil , Telugu