संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा यांनी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडची जबाबदारी स्वीकारली
Posted On:
01 JAN 2023 5:25PM by PIB Mumbai
एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा यांनी 01 जानेवारी 2023 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम एअर कमांडची जबाबदारी स्वीकारली.
एअर मार्शल हे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर आहेत आणि जून 1985 मध्ये त्यांना भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ते वेलिंग्टनच्या प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. अनुभवी फायटर पायलट, श्रेणी 'अ' पात्र फ्लाइंग इंस्ट्रक्टर, फायटर स्ट्रायकर लीडर, इन्स्ट्रुमेंट रेटिंग इंस्ट्रक्टर आणि परीक्षक, एअर मार्शल सिन्हा यांना 4500 तासांपेक्षा जास्त काळ लढाऊ विमान उडवण्याचा अनुभव आहे.
आपल्या 37 वर्षांच्या सेवा कारकिर्दीत, एअर मार्शल सिन्हा यांनी महत्त्वाच्या कमांड आणि स्टाफची पदे भूषविली आहेत. यामध्ये फायटर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर, फ्लाइंग स्टेशनवर मुख्य प्रशिक्षक (फ्लाइंग), रॉयल एअर फोर्स व्हॅली, युनायटेड किंगडम येथे प्रशिक्षण समन्वय अधिकारी, जिथे त्यांनी हॉक विमान उडवले होते, हवाई मुख्यालयातील प्रधान संचालक कार्मिक अधिकारी, प्रतिष्ठित हवाई दल स्टेशनचे एअर ऑफिसर कमांडिंग, हवाई दल प्रमुखांचे हवाई सहाय्यक आणि हवाई मुख्यालयातील सहाय्यक हवाई कर्मचारी ऑपरेशन्स(ऑफेन्सिव्ह) आदींचा समावेश आहे. ते प्रीमियर फायटर एसक्यूएन (Sqn) चे कमोडोर कमांडंट आहेत आणि सध्याची नियुक्ती घेण्यापूर्वी ते हवाई मुख्यालयात डायरेक्टर जनरल एअर (ऑपरेशन्स) पदावर कार्यरत होते.
हवाई अधिकारी सिन्हा हे ‘विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘अति विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी आहेत.
एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा हे एअर मार्शल एस प्रभाकरन यांचे उत्तराधिकारी आहेत जे 31 डिसेंबर 2022 रोजी भारतीय हवाई दलामध्ये 39 वर्षांपेक्षा जास्त उल्लेखनीय सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले.
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887886)
Visitor Counter : 275