दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मल्टी-सिस्टम ऑपरेटर्स (एमएसओ) नोंदणीच्या नूतनीकरणावरील शिफारशी केल्या जारी

Posted On: 29 DEC 2022 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2022

 

ट्राय, अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) ने आज "मल्टी-सिस्टम ऑपरेटर्स (एमएसओ), अर्थात बहु-प्रणाली संचालक नोंदणीच्या नूतनीकरणावरील आपल्या शिफारशी जारी केल्या. 

भारतीय प्रसारण क्षेत्राचे डिजिटलायझेशन 2012 मध्ये सुरू झाले आणि देशभरात ते मार्च 2017 पर्यंत पूर्ण झाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (एमआयबी) जून 2012 मध्ये डीएएस (DAS) अंमलबजावणी दरम्यान मल्टी सिस्टम ऑपरेटर (MSOs) साठी नवीन नोंदणी जारी केली, जी जून 2022 मध्ये त्याचे नूतनीकरण/विस्तारासाठी खुली होती. तथापि, केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 अंतर्गत, एमएसओ नोंदणीच्या नूतनीकरणाच्या तरतुदीचा उल्लेख नाही. हे लक्षात घेता, प्राधिकरणाला एमआयबी कडून एमएसओ नूतनीकरण प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांवरील शिफारशी मागणारा संदर्भ प्राप्त झाला आहे.

याबाबतच्या सूचना (टिप्पणी) नोंदवण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022, तर प्रति-सूचना  17 ऑगस्ट 2022 होती. काही भागधारकांच्या विनंतीवरून ही मुदत अनुक्रमे 24 ऑगस्ट 2022 आणि 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती.

ट्राय ला 10 भागधारकांकडून विचार सल्लामसलत कागदपत्रांबाबत सूचना मिळाल्या असून कोणतीही प्रति-सूचना प्राप्त झाली नाही. या सूचना (टिप्पण्या) ट्रायच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संदर्भात, 19 ऑक्टोबर 2022 रोजी ऑनलाइन माध्यमातून खुली चर्चा देखील आयोजित करण्यात आली होती.

सल्लामसलत प्रक्रियेदरम्यान भागधारकांकडून प्राप्त झालेल्या सर्व सूचना/प्रति-सूचना आणि संबंधित मुद्द्यांचे पुढील विश्लेषण विचारात घेतल्यानंतर, प्राधिकरणाने त्यांच्या शिफारशींना अंतिम रुप दिले आहे. शिफारशींची ठळक वैशिष्ट्ये, शिफारशींचा संपूर्ण मजकूर TRAI च्या www.trai.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1887411) Visitor Counter : 190


Read this release in: Tamil , English , Urdu