खाण मंत्रालय
ऑक्टोबर 2022 मध्ये खनिज उत्पादनात 2.5% वाढ
Posted On:
29 DEC 2022 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2022
ऑक्टोबर, 2022 महिन्यासाठी खाणकाम आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक (आधार: 2011-12=100) 112.5 वर गेला आहे. ऑक्टोबर, 2021 मधील पातळीच्या तुलनेत तो 2.5% जास्त आहे. इंडियन ब्युरो ऑफ माइन्सच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-ऑक्टोबर, 2022-23 या कालावधीतील एकूण वाढ मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 4% अधिक आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये महत्त्वाच्या खनिजांची उत्पादन पातळी पुढील प्रमाणे होती: कोळसा 662 लाख टन; लिग्नाइट 35 लाख टन; नैसर्गिक वायू (वापरलेला) 2829 दशलक्ष घन. मी.; पेट्रोलियम (क्रूड) 25 लाख टन; बॉक्साइट 2069 हजार टन; क्रोमाईट 133 हजार टन; तांबे कॉन्क. 10 हजार टन; सोने 98 किलो; लोह खनिज 207 लाख टन; शिसे कॉन्क. 31 हजार टन; मॅंगनीज धातू 167 हजार टन; झिंक कॉन्क. 130 हजार टन; चुनखडी 317 लाख टन; फॉस्फोराईट 153 हजार टन; मॅग्नेसाइट 9 हजार टन आणि हिरे 114 कॅरेट.
ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत ऑक्टोबर, 2022 मध्ये सकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांमध्ये हिरे (375%), फॉस्फोराइट (21%), बॉक्साइट (15.1%) लोह खनिज (8.7%), कोळसा (3.5%) आणि क्रोमाइट (1.9%). यांचा समावेश आहे.
नकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या इतर महत्त्वाच्या खनिजांमध्ये चुनखडी (-0.8%), पेट्रोलियम (-2.2%), नैसर्गिक वायू (U) (- 4.2%). झिंक कॉन्क (-5.1%), लिग्नाइट (-6.1), शिसे कॉन्क (-6.7%), मॅग्नेसाइट (-7.9%), तांबे कॉन्सन्ट्रेट (-8.5%), सोने (-10.1%) आणि मॅंगनीज धातू (-19.0%).यांचा समावेश आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1887297)
Visitor Counter : 247