दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकांसाठी ‘ऑनलाईन विनंती बदली पोर्टल’ केले सुरू
Posted On:
28 DEC 2022 8:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2022
दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत टपाल विभागाने आज ग्रामीण डाक सेवकांसाठी (जीडीएस ) एक ‘ऑनलाइन विनंती बदली पोर्टल’ सुरू केले आहे. टपाल सेवेचे महा संचालक आलोक शर्मा, यांनी 23 टपाल परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे हे कर्मचा-यांच्या बदल्यांसाठी उपयुक्त ठरणारे पोर्टल सुरू केले. पोर्टलचा प्रारंभ करताना त्यांनी माहिती दिली की, जीडीएसकडून अर्ज मागवण्यापासून ते मंजुरी आणि बदली आदेश जारी करण्यापर्यंतची संपूर्ण बदली प्रक्रिया आता या पोर्टलद्वारे कागदविरहीत आणि सोपी करण्यात आली आहे.
भारतीय टपाल विभाग म्हणजे जगभरातील सर्वात मोठे जाळे असणारा टपाल विभाग आहे. टपाल विभागामध्ये देशभरामध्ये 1,56,000 पेक्षा जास्त टपाल कार्यालये आहेत, त्यापैकी 1,31,000 पेक्षा जास्त शाखा ‘पोस्ट ऑफिस’ (बीओज्) ग्रामीण भागात आहेत. ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस) द्वारे टपाल विभागाच्या सुविधा लोकांना पुरविल्या जातात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ऑनलाइन रिक्वेस्ट ट्रान्सफर पोर्टल लाँच’ सुरू करणे म्हणजे प्रशासन प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे वेळ आणि संसाधनांचीही बचत होईल. या पोर्टलचा प्रारंभ झाल्यानंतर, एकाच दिवसात 5000 हून अधिक जीडीएसच्या बदल्यांना ऑनलाइन पोर्टलद्वारे मंजुरी देण्यात आली.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1887160)
Visitor Counter : 256