वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून एनटीटीएमअंतर्गत यंत्रसामुग्री, हत्‍यारे, उपकरणे आणि चाचणीसाठी लागणा-या साधनांच्या रचना, विकास आणि निर्मितीसाठी निधी पुरवठ्याबाबत संशोधन प्रस्ताव आमंत्रित

Posted On: 28 DEC 2022 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2022

 

तंत्रज्ञानाच्या मदतीने यंत्रमाग वस्त्रोद्योग उत्पादनात भारताला जागतिक आघाडीचे स्थान प्राप्‍त व्‍हावे यासाठी, वस्त्रोद्योग मंत्रालयाने एनटीटीएमअंतर्गत या क्षेत्राला लागणारी यंत्रसामुग्री, हत्‍यारे, उपकरणे आणि चाचणीसाठी लागणा-या साधनांच्या डिझाइन्सचा, विकास आणि निर्मितीसाठी निधी पुरवठ्याबाबत  संशोधन प्रस्ताव  आमंत्रित  केले आहेत. 

आजच्या काळामध्‍ये उच्च-तंत्रज्ञान यंत्रे, उपकरणे, प्रकल्पामध्‍ये एखाद्या विशिष्‍ट कामासाठी वापरली जाणारी विशेष साधने आणि उपकरणे मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागत आहेत. वस्त्रोद्योगाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशाला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी डिझाईन, अभियांत्रिकी, फॅब्रिकेशन आणि नमुने यासाठी स्थानिक कौशल्याचा वापर करून स्वदेशीकरणाकडे जाणे आवश्यक आहे. म्हणून घटक-। अंतर्गत  (संशोधन, नवोन्मेष आणि विकास) एनटीटीएम  ‘मेक इन इंडिया’  संकल्पनेवर यंत्रावर तयार करणा-या  कापडासाठी म्हणजेच यंत्रमागासाठी यंत्रसामग्री, उपकरणे, साधने आणि चाचणी साधनांच्या मदतीने स्वदेशी उत्पादन करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्‍यासाठी मदत करत आहे. 

यामध्‍ये वस्त्रोद्योगाला उपयोगी असणा-या वस्‍तूंची विशेषत: यंत्रसामुग्रीची  निर्मिती  करणा-या कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्‍यात आले आहेत.  यामध्‍ये वस्त्र/वस्त्र मूल्य साखळी उत्पादक, संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था,  (सार्वजनिक आणि खाजगी अर्थसहाय्य करणा-या  दोन्ही कंपन्या) अशा उत्पादनात गुंतलेल्या कंपन्यांकडून नवीन प्रस्ताव मागविण्‍यात आले आहेत.

याविषयीचा अधिक तपाशील तसेच मार्गदर्शक तत्वे राष्‍ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे : 

nttm.texmin.gov.in

https://nttm.texmin.gov.in/pdf/WhatsNew/GuidelineMachineryManufacturing.pdf

अत्याधुनिक यंत्रमाग  वस्त्रोद्योगाचा विकास करण्‍याच्या हेतूने,  यंत्रसामग्री आणि उपकरणे यामध्‍ये  स्वदेशी  उच्च तंत्रज्ञान वापरून उत्‍तम प्रकारे  उत्पादन क्षमता निर्माण करण्‍यासाठी या योजनेत समर्थन देण्‍यात येणार आहे आणि उत्पादन क्षमता वाढविण्‍यात येणार आहे. अशा प्रकारे यंत्रमाग वस्त्रांमध्ये भारताच्या तंत्रज्ञान सज्जतेचा  स्तर  वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्‍यात येणार आहे.

 

* * *

S.Patil/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1887061) Visitor Counter : 237


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu