विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
वर्ष अखेर आढावा 2022: विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग
Posted On:
25 DEC 2022 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2022
सायन्स सायटेशन इंडेक्स (एससीआय) जर्नल्समध्ये भारताच्या प्रकाशनांच्या संख्येत लक्षणीय वाढ:
- जागतिक स्तरावर 2013 मध्ये 6 व्या स्थानावर असलेला भारत आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
- विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयात (जवळपास 25,000) पीएचडी प्रदान केलेल्या संख्येचा विचार करता अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- स्टार्टअप्सच्या (77,000) संख्येच्या बाबतीत आणि युनिकॉर्नच्या संख्येनुसार (107) भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- जगातील 130 अर्थव्यवस्थांमध्ये भारताने जागतिक नावीन्यता निर्देशांकाच्या (जीआयआय) क्रमवारीत 2015 मध्ये असलेल्या 81 व्या क्रमांकावरून 2022 मध्ये 40 व्या क्रमांकावर घेतली मोठी झेप.
- जागतिक नावीन्यता निर्देशांकानुसार भारत 34 निम्न मध्यम-उत्पन्न अर्थव्यवस्थांमध्ये दुसऱ्या आणि 10 मध्य आणि दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थांमध्ये अव्वल क्रमांकावर आहे.
- तंत्रज्ञान व्यवहारांसाठी जगातील सर्वात आकर्षक गुंतवणूक राष्ट्रांमध्ये भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- गेल्या 10 वर्षात संशोधन आणि विकास (संशोधन आणि प्रायोगिक विकासावरील एकूण देशांतर्गत संशोधन जीइआरडी) वरील एकूण खर्च तिपटीने वाढला आहे.
- गेल्या 9 वर्षात बाह्य संशोधन आणि विकासात महिलांचा सहभागही दुप्पट
- निवासी पेटंट दाखल करण्याच्या बाबतीत भारत 9व्या क्रमांकावर
कार्यक्रम स्तरावरील कामगिरी
- गेल्या 8 वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रणालीतील गुंतवणूक दुप्पट झाली आहे.
- 2014-15 मध्ये सुमारे 2900 कोटी रुपये असलेली गुंतवणूक 2022-23 मध्ये 6002 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 2015 मध्ये सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन देशभरातील विविध संस्थांमध्ये 4 प्रवेश स्तरीय आणि 15 मध्यम स्तरीय प्रणाली आणि 24 पीएफ कॉम्प्युट क्षमता प्रणालीसह राष्ट्रीय उच्च कार्यक्षमता संगणन पायाभूत सुविधांना चालना देत आहे.
- आंतरविद्याशाखीय सायबर- भौतिक प्रणालीवर आधारित राष्ट्रीय मिशन डिसेंबर 2018 मध्ये 3660 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाने सुरू झाले. संशोधन आणि नवोन्मेष केंद्रांद्वारे ही योजना कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) सारख्या सायबरफिजिकल क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देत आहे. या मिशनने देशभरातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये 25 तंत्रज्ञान इनोव्हेशन हब तयार केले आहेत. हे हब मिशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्य करत आहेत. या योजने अंतर्गत विविध सायबर भौतिक प्रणाली आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान प्रणालीचा विचार केला गेला आहे. त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा बँक्स आणि डेटा सेवा, डेटा विश्लेषण, रोबोटिक्स आणि स्वायत्त प्रणाली, सायबर सुरक्षा आणि भौतिक पायाभूत सुविधांसाठी सायबर सुरक्षा, संगणक दृष्टी, स्वायत्त नेव्हिगेशन आणि डेटा संपादन प्रणाली (मानवरहीत हवाई वाहने, दूरस्थपणे चालवलेली वाहने इ.), क्वांटम तंत्रज्ञान इ.
- सर्व्हे ऑफ इंडियाने देशभर उच्च-रिझोल्यूशन भू-स्थानिक मॅपिंगची सुरूवात केली: सर्व्हे ऑफ इंडिया हा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा अधीनस्थ विभाग आहे. या विभागाने 10 सेंटीमीटरच्या अतिशय उच्च रिझोल्यूशनमध्ये ड्रोन तंत्रज्ञानासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून देशाचे पॅन-इंडिया भू-स्थानिक मॅपिंग सुरू केले आहे. त्यामुळे आधारभूत माहिती म्हणून अल्ट्रा हाय-रिझोल्यूशन नॅशनल टोपोग्राफिक डेटा असलेल्या काही राष्ट्रांच्या निवडक समूहात भारत सामील झाला आहे. अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे 1:500 स्केलचे मोठ्या प्रमाणात मॅपिंग पूर्ण झाले आहे. सर्व्हे ऑफ इंडियाने 2,00,000+ गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड वितरणासाठी (एसव्हीएएमआयटीव्हीए- गावांचे सर्वेक्षण आणि सुधारित तंत्रज्ञानासह मॅपिंग)चा भाग म्हणून ड्रोन सर्वेक्षण यशस्वीरित्या केले आहे आणि गावातील घरमालकांना 'अधिकारांची नोंद' प्रदान केली आहे.
- विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या कार्यक्रमांनी नवकल्पनांच्या परिसंस्थेच्या असामान्य कामगिरीला चालना दिली: नवकल्पना विकसित करण्यासाठी निधी उभारण्यासाठी( नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग अँड हार्नेसिंग इनोव्हेशन्स) या नावाचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नवकल्पनांची संपूर्ण मूल्य साखळी तयार होत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने तयार केलेल्या 153 इनक्यूबेटरच्या जाळ्याद्वारे 3,681 स्टार्टअप्सना पाठबळ दिल्याने भारताच्या नवकल्पना परिसंस्थेवर काही मोठे परिणाम झाले आहेत. त्यामुळे एकत्रित थेट रोजगार म्हणून 65,864 नोकर्या निर्माण केल्या आहेत आणि 27,262 कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे तसेच 19,262 कोटींची बौद्धिक संपत्ती निर्माण झाली आहे.
- शाळांमध्ये नाविन्य आणणे: 2018 मध्ये मिलियन माइंड्स ऑगमेंटिंग नॅशनल ॲस्पिरेशन अँड नॉलेज (मानक) कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. देशभरातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून 10 लाख कल्पना मिळवण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. निवडलेल्या हुशार विद्यार्थ्यांना जिल्हा, राज्य आणि नंतर राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धेसाठी पाठवले जात आहे.
- महिला शास्त्रज्ञांचे सक्षमीकरण: लिंग असमतोल दूर करण्यासाठी किरणसारखी नवीन योजना सुरू करण्यात आली. तरुण महिलांना आकर्षित करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी विज्ञान ज्योती या प्रायोगिक योजनेची मर्यादित प्रमाणात आणि कालावधीसाठी चाचणी घेण्यात आली.
- तरुण शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधन कार्यांवर विज्ञान लेख लिहिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अवसर ही योजना सुरू केली आहे.
- विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (एसइआरबी) ने सर्व लोकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समानतेने प्रचार करण्यासाठी अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत: विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ ही विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा अंतर्गत येणारी एक वैधानिक संस्था आहे.
- एसइआरबी-पॉवर (प्रमोटिंग ऑपॉर्च्युनिटी फॉर वुमन इन एक्सप्लोरेटरी रिसर्च)" सारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. एसइआरबी-पॉवर ही योजना केवळ महिला शास्त्रज्ञांसाठी उच्च स्तरावर संशोधन आणि विकास करण्यासाठी तयार केलेली योजना आहे. अनिवासी भारतीयांसह सर्वोत्कृष्ट जागतिक विज्ञान आणि शास्त्रज्ञ भारतात आणण्याचे लक्ष्य एसइआरबी-वज्र या योजनेचे आहे. स्टेट युनिव्हर्सिटी रिसर्च एक्सलन्स (एसइआरबी-शुअर) ही योजना विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये एक मजबूत संशोधन आणि विकास परिसंस्था तयार करण्यासाठी आहे. एसइआरबी- फायर ही योजना सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने उद्योगांशी संबंधित असलेल्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधन आणि विकासाला समर्थन देण्यासाठी औद्योगिक संशोधन प्रतिबद्धता निधी पुरवते.
- तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणाला चालना: भारतीय औद्योगिक समस्या आणि इतर एजन्सींना तंत्रज्ञान विकास मंडळ आर्थिक सहाय्य देते, स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न करते किंवा आयात केलेल्या तंत्रज्ञानाचा व्यापक देशांतर्गत अनुप्रयोगांसाठी वापर करते. अलीकडील वर्षात अनेक महत्त्वाच्या यशोगाथा पाहिल्या तर हे लक्षात येते.
- कोविड 19 चा मुकाबला करण्यासाठी विजयी मोहीम: कोविड 19 महामारीमुळे उद्भवलेल्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी अनेक स्वायत्त संस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे कार्यक्रम आणि तंत्रज्ञान विकास मंडळाने अगदी कमी वेळात अनेक देशांतर्गत उपाय शोधले आहेत.
- विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्था मूलभूत संशोधन आणि अनुवादात्मक संशोधन या दोहोंमध्ये विविध संकल्पना राबवत लक्षणीय योगदान देत आहेत.
- आंतर-मंत्रालय सहकार्य विकसित केले - इम्प्रिंट-इम्पॅक्टिंग रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी एमएचआरडी सह 50:50 च्या भागीदारीमध्ये - निवडलेल्या तंत्रज्ञान डोमेनमधील ज्ञानाचे व्यवहार्य तंत्रज्ञानात (उत्पादन आणि प्रक्रिया) भाषांतर करून आपल्या राष्ट्रासमोरील सर्वात संबंधित अभियांत्रिकी आव्हानांचे निराकरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- रेल्वे मंत्रालयासह रेल्वे इनोव्हेशन मिशन- आधुनिक रेल्वेचे डबे तयार करणाऱ्या कारखान्यासाठी सायबर भौतिक उद्योग 4.0 अंमलबजावणीचा पहिला टप्पा.
- एसइआरबी- विज्ञान तंत्रज्ञान विभागाने इंटेल इंडिया सोबत भारतातील सखोल तंत्रज्ञानावर आधारित संशोधन प्रगत करण्यासाठी अशा प्रकारचा पहिला उपक्रम सुरू केला आहे: भारतीय संशोधन समुदाय लवकरच परिवर्तनशील आणि राष्ट्रीय स्तरावर मोठा प्रभाव टाकू शकेल अशा सखोल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उद्योग-संबंधित संशोधन संधींचा पाठपुरावा करण्यासाठी सक्षम होईल. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची वैधानिक संस्था असलेल्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ एसइआरबी द्वारे सुरू केलेल्या 'फंड फॉर इंडस्ट्रियल रिसर्च एंगेजमेंट (फायर)' नावाच्या पहिल्या प्रकारच्या संशोधन उपक्रमाद्वारे या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. हा उपक्रम इंटेल इंडियाच्या सहकार्याने 29 जून 2021 रोजी सुरू झाला.
- नॉर्थ ईस्ट सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन अँड रीच (एनइसीटीएआर) ने ईशान्येकडील आव्हानांवर शाश्वत उपायांसाठी तंत्रज्ञानाला चालना दिली: भारतात केशराचे उत्पादन आतापर्यंत काश्मीरच्या काही भागांपुरतेच मर्यादित होते. आता केंद्रित प्रयत्नांमुळे ईशान्येच्या काही भागांतही केशराची शेती होऊ लागली आहे. नॉर्थ ईस्ट सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन अँड रीचने (एनइसीटीएआर) दक्षिण सिक्कीमच्या यांगांग गावात प्रथमच केशराची यशस्वी लागवड केली. आता त्याचा विस्तार अरुणाचल प्रदेशच्या तवांग आणि मेघालयातील बारापानी येथे केला जात आहे.
- भारताच्या स्मार्ट ग्रिड आणि ऑफ ग्रिड नेतृत्वासह मिशन इनोव्हेशन कार्यक्रम - स्वच्छ ऊर्जा आणि पाणी, सूक्ष्म विज्ञान आणि तंत्रज्ञान, हवामान बदल संशोधन आणि पोहोच यावरील कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट प्रगती केली आहे.
- आंतरराष्ट्रीय कनेक्टस्: सर्वोत्तम जागतिक विज्ञानाशी जोडण्यासाठी नवीन आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान सहयोग, ज्यामध्ये तीस मीटर टेलीस्कोप प्रॉजेक्ट, भारत-इस्रायल औद्योगिक संशोधन आणि विकास तसंच तंत्रज्ञान नवकल्पना निधी यांचा समावेश आहे.
- काही प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरण तयार करणे: वर्षभरात दोन मार्गदर्शक तत्त्वे आणली आणि दोन प्रमुख धोरणे अंतिम टप्प्यात आहेत.
वैज्ञानिक संशोधन इन्फ्रास्ट्रक्चर शेअरिंग मेंटेनन्स अँड नेटवर्क्स (एसआरआयएमएएन) मार्गदर्शक तत्त्वे, वैज्ञानिक सामाजिक जबाबदारी (एसएसआर) मार्गदर्शक तत्त्वे, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम (एसटीआय) धोरण, राष्ट्रीय भूस्थानिक धोरण संशोधन आणि विकासात लोकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी योजनांमधील महत्त्वाची उपलब्धी.
- 6,39,550 इनस्पायर (इनोव्हेशन इन सायन्स परसुट फॉर इनस्पायर्ड रिसर्च) पुरस्कार इयत्ता सहावी ते दहावीच्या शाळकरी मुलांना दिले. विद्यापीठ स्तरावरील शिक्षणासाठी 75,000 इन्स्पायर शिष्यवृत्त्या दिल्या.
- तरुण विद्यार्थ्यांना गेल्या 5 वर्षांत 6800 इन्स्पायर डॉक्टरेट फेलोशिप मिळाली.
- गेल्या 5 वर्षात तरुण संशोधकांना 1000 इन्स्पायर फॅकल्टी मिळाल्या.
* * *
S.Thakur/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886857)
Visitor Counter : 738