रसायन आणि खते मंत्रालय
वर्ष अखेर आढावा -2022 खत विभाग
Posted On:
23 DEC 2022 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022
या वर्षात रासायनिक खते विभाग देशभरातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध व्हावीत, याची खातरजमा करण्याच्या दृष्टीने युरिया अनुदान योजना, पोषक घटकांवर आधारित अनुदान योजना आणि थेट लाभ हस्तांतरण योजना यासारखे प्रकल्प खते अनुदानाचे पैसे देण्यासाठी राबवीत आहे.
शिवाय, खतांचा पुरवठा वेळेवर व्हावा तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या यांपैकी कोणते खत निवडावे, याबद्दलची शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती नाहीशी व्हावी, यादृष्टीने खत अनुदान योजनेअंतर्गत एक देश एक खत योजना राबवीत आहे. यावर्षी सध्या अस्तित्वात असलेले गाव, ब्लॉक/उप जिल्हा/तालुका आणि जिल्हा स्तरावरील किरकोळ खत दुकानांचे माॅडेल किरकोळ खत दुकानात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी संबंधित सर्व गरजा आणि सेवांसाठी ही दुकाने एक थांबा दुकाने म्हणून काम करतील. जिल्हा स्तरावर 600 किरकोळ दुकाने पीएमकेएसके योजनेत रूपांतरित करण्यात आली आहेत.
युरिया अनुदान योजना:
युरियाचा विचार करता, वैधता सूचनेनुसार समान कमाल किरकोळ भावाने ( एम आरपी) युरियाची विक्री केली जाते. सध्या 45 किलो वजनाचे युरियाचे पोते वैधता सूचनेनुसार 242 रुपये या कमाल किरकोळ भावाने विकले जाते ( नीम आच्छादन शुल्क आणि करांव्यतिरिक्त ). शेताच्या बांधावर दिल्या जाणाऱ्या युरियाची किंमत आणि निव्वळ बाजारभाव यातील फरकाएवढे अनुदान युरिया उत्पादकाला/ आयातदाराला भारत सरकारकडून दिले जाते. त्यानुसार, सर्व शेतकऱ्यांना ठराविक अनुदानित दराने युरियाचा पुरवठा होतो.
पोषक घटकांवर आधारित अनुदान योजना:
पोषक घटकांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध व्हावीत, यादृष्टीने 2021-22 या वर्षासाठी स्फुरद आणि पोटॅशयुक्त खतांसाठीच्या अनुदान दरात 20 मे 2021, आणि 13 ऑक्टोबर 2021 रोजी वाढ केली ( डीएपी तसेच नेहमी वापरल्या जाणाऱ्या 3 एनपीके खतांवर विशेष भरपाईसह) आणि त्यानंतर खरीप -2022 साठी (1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी) यात आणखी वाढ करण्यात आली. एनबीएस योजनेअंतर्गत नत्र, स्फुरद, पोटॅश आणि सल्फर या पोषक घटकांसाठी वाढ करण्यात आलेले अनुदानित दर प्रति किलो प्रमाणात पुढीलप्रमाणे:
S.
No.
|
Nutrients
|
NBS (Rs. Per Kg
of Nutrient)
|
NBS (Rs. Per Kg
of Nutrient
|
NBS (Rs. Per Kg of
Nutrient)
|
|
|
(from 01.04.2021
to 19.05.2021)
|
(from 20.05.2021
to 31.03.2022) **
|
(from 01.04.2022 to
30.09.2022)
|
1.
|
N
|
18.789
|
18.789
|
91.96
|
2.
|
P
|
14.888
|
45.323
|
72.74
|
3.
|
K
|
10.116
|
10.116
|
25.31
|
4.
|
S
|
2.374
|
2.374
|
6.94
|
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोषक घटकांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2022-23 साठी ( 01.10.2022 ते 31.03.2023 )पी आणि के खतांच्या नत्र,स्फुरद, पोटॅश आणि सल्फर घटकांसाठी प्रति किलोचे दर सुचविणारा रासायनिक खते विभागाचा प्रस्ताव पुढीलप्रमाणे मंजूर केला :
2022-23 या वर्षात 1.4.2022 ते 16.12.2022 या दरम्यानचा अनुदान खर्च खालीलप्रमाणे:
Subsidy on P&K
fertilizers
|
Subsidy on Urea
|
Total Subsidy Outgo
|
55648.02
|
108325.72
|
163973.74
|
खत अनुदान देण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्प :
रासायनिक खते विभागाने शेतकऱ्यांना सुधारित खतसेवा देण्याच्या दृष्टीने खत अनुदान भरणा करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजनेचा अवलंब केला आहे. या योजनेअंतर्गत, विविध दर्जांच्या खतांवरील 100% अनुदान खत कंपन्यांना किरकोळ दुकानदारांकडून लाभार्थ्यांना होणाऱ्या प्रत्यक्ष विक्रीच्या आधारे केले जाते.
शेतकरी/खरेदीदारांना होणारी अनुदानित खतांची विक्री प्रत्येक किरकोळ दुकानात बसवलेल्या विक्री बिंदू उपकरणांच्या आधारे केली जाते आणि लाभार्थ्यांची ओळख आधार ओळखपत्र, किसान क्रेडिट कार्ड, मतदार ओळखपत्र, इत्यादींच्या सहाय्याने पटवली जाते.
खते हालचाल विभाग:
खतांची उपलब्धता: 2022-23 मध्ये ( 20.12.2022 पर्यंत) युरिया, डीएपी, एनपीके, इत्यादी खतांची भारतातील उपलब्धता सोयीस्कर होती. देशभरात सर्व खतांचा सुरळीत पुरवठा आणि सहज उपलब्धता असेल, याची निश्चिती रासायनिक खते विभागाने केली होती. 2022-23 मधील ( 1.4.2022 ते 20.12.2022) खतांचे उत्पादन, आयात आणि खप खालीलप्रमाणे:
(Figures in LMT)
Year
|
Import of Fertilizers
|
Urea
|
DAP
|
MOP
|
NPKS
|
Total
|
2022-23
|
46.13
|
47.81
|
15.02
|
19.43
|
128.39
|
(Figures in ‘LMT’)
Year
|
Production of Fertilizers
|
Urea
|
DAP
|
MOP
|
NPKS
|
SSP
|
Total
|
2022-23
|
187.21
|
27.41
|
-
|
67.21
|
38.94
|
320.76
|
(Figures in ‘LMT’)
Year
|
Consumption of Fertilizers
|
Urea
|
DAP
|
MOP
|
NPKs
|
Total
|
2022-23
|
232.54
|
83.53
|
11.23
|
74.16
|
401.46
|
देशभरात खतांच्या पुरेशा उपलब्धतेची खातरजमा करण्यासाठी सरकारने केलेली उपाययोजना:
प्रत्येक पीक हंगाम सुरू होण्यापूर्वी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग सर्व राज्ये सरकारांनी सल्लामसलत करून खतांच्या गरजेचे विश्लेषण करतो. हे झाल्यानंतर,हा विभाग प्रत्येक राज्याला प्रत्येक महिन्याला गरज असणाऱ्या सर्व खतांची यादी तयार करतो.
तसेच हा विभाग राज्यांच्या महिन्यानुसारच्या यादीच्या आधारे मासिक पुरवठा योजना जारी करून पुरेशा प्रमाणातील खते राज्यांसाठी मंजूर करतो आणि उपलब्धतेवर सतत लक्ष ठेवतो.
संपूर्ण देशातील सर्व प्रमुख अनुदानित रासायनिक खतांच्या हालचालीवर एकात्मिक खते देखरेख पद्धती ( आय एफ एम एस ) आधारे ऑनलाईन वेब आधारित देखरेख ठेवली जाते; रेल्वे वाघिणींसाठी वेळेवर मागणी करून पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी खतांचे उत्पादक आणि आयातदार यांच्याशी समन्वय ठेवण्याचा नियमित सल्ला राज्य सरकारांना दिला जातो.
नॅनो युरिया
भारत सरकारने खत नियंत्रण आदेश,1985 अन्वये, नॅनो नायट्रोजनचे अचूक मोजमाप जारी केले आहे.
नॅनो खते आकार अवलंब गुण, पृष्ठभाग -आकार गुणोत्तराचे मोठे प्रमाण आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशमान गुणधर्मामुळे वनस्पती पोषणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
वनस्पतींना पोषक घटक अधिक सक्षमपणे वापरता यावेत, यासाठी नॅनो खते नियंत्रित पद्धतीने पोषक घटक सोडण्याचे काम करतात.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) तसेच कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांच्या शेतावर 94 पिकांसाठी घेतलेल्या चाचण्यांमधून आढळून आले आहे की पृष्ठभागावरील नॅनो युरियाच्या वापरामुळे पीक उत्पन्नात 8% वाढ होते.
इफ्फकोकडून कलोल कारखान्यात 1 ऑगस्ट 2021 पासून नॅनो युरियाचे व्यापारी उत्पादन सुरू झाले. आजच्या तारखेपर्यंत नॅनो युरियाच्या सुमारे 5 कोटी बाटल्यांचे उत्पादन झाले आहे. द्रव खतांच्या ड्रोनद्वारे फवारणीसाठी उद्योजक तयार करण्यासाठी रासायनिक खते विभागाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
* * *
S.Thakur/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886827)
Visitor Counter : 704