नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रमुख विमानतळांवर गर्दीच्या वेळेत उद्भवलेल्या समस्यांचा आढावा

Posted On: 21 DEC 2022 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2022

नागरी विमान वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी आज बेंगळुरू आणि मुंबई विमानतळ चालकांची (ऑपरेटर्सची) बैठक घेतली. बेंगळुरू आणि मुंबई विमानतळांवर गर्दीच्या वेळेत होणारी कोंडी आणि अव्यवस्था कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक  संचालनालयाचे  (डीजीसीए) महासंचालक आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाचे (बीसीएएस)  अधिकारी आणि  इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

काही प्रमुख विमानतळे गर्दीचा सामना करत आहेत तसंच सहलीच्या हंगामात प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे विमानतळांवर विविध ठिकाणी प्रवाशांना अधिक वेळ प्रतीक्षा करायला लागत आहे, असे सरकारच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भातली एक बैठक नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 7 डिसेंबर , 2022 रोजी घेतली होती. त्यावेळी त्यांनी देशातील प्रमुख विमानतळाच्या ऑपरेटर्सना प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन समस्यांच्या मूळाशी जाऊन क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले होते.

प्रवाशांच्या संख्येच्या वाढीशी सुसंगत, सुविधा देणे, विमान प्रवास त्रासमुक्त करण्यासाठी  विमानतळ चालकांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे

अतिरिक्त क्षमता तयार करणे तसेच प्रणाली आणि प्रक्रियेत  पुनर्रचना करण्यासाठी गर्दीच्या  परिस्थितत सज्ज असणे आवश्यक आहे यावर सचिवांनी आजच्या बैठकीत भर दिला.

विमानतळ चालकांना पुढील पैलूंवर दररोज अहवाल देण्यास सांगितले आहे.

(ए) रिअल टाइम बेसिस प्रतीक्षा वेळ सूचित करण्यासाठी एंट्री गेट्सवर, सिक्युरिटी लेनवर साइन बोर्ड लावणे आणि सोशल मीडिया फीड्स माध्यमातून ही माहिती शेअर करणे

(बी) सर्व एअरलाइन्स त्यांचे चेक इन योग्यप्रकारे करत आहेत का

पुरेसे काउंटर आहेत का हे पाहणे

(सी) अतिरिक्त क्ष-किरण मशीन ठेवणे, सुरक्षा मार्गांची संख्या वाढवणे,

(डी) गर्दीच्या वेळांचे संतुलन राखणे, सुरक्षा मार्गांच्या उपलब्धतेसह उड्डाण वेळापत्रक,

(ई) प्रवाशांना सर्व संबंधित माहिती देणे

प्रमुख विमानतळांवरील परिस्थितीचे सतत निरीक्षण केल्यामुळे आणि क्षमता वाढल्याने परिस्थिती सुधारली आहे आणि येत्या काही दिवसांत ती आणखी सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.

R.Aghor/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1885522) Visitor Counter : 210


Read this release in: English , Urdu , Hindi