रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

ऑक्‍टोबर, 2022 पर्यंत एकूण 2843 किमी लांबीच्या समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा (मार्गिका) 1610 किमी लांबीचा टप्पा पूर्ण


व्यापार-ते-ग्राहक आणि व्यापार-ते-व्यापार बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारतीय रेल्वेने भारतीय टपाल विभागाच्या सहयोगाने सुरु केली संयुक्त पार्सल सेवा

Posted On: 21 DEC 2022 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2022

समर्पित मालवाहतुकीसाठी, भारतीय रेल्वेने समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (डीएफसी), समाविष्ट पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (WDFC- दादरी ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट 1506 किमी) आणि पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (EDFC- लुधियाना ते सोननगर-1337 किमी) हा एकूण 2843 किमी लांबीचा पायाभूत सुविधेचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे.

ऑक्टोबर 2022 पर्यंत, या एकूण 2843 किमी लांबीच्या मार्गापैकी एकूण 1610 किमी (EDFC चे 799 किमी आणि WDFC चे 811 किमी) लांबीच्या मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.         

भारतीय रेल्वेने भारतीय टपाल विभागाच्या सहयोगाने संयुक्त पार्सल सेवा (जेपीपी) सुरु केली आहे. ई-कॉमर्स आणि एमएसएमई बाजारपेठेवर विशेष लक्ष केंद्रित करत, व्यापार-ते-ग्राहक (B2C) आणि व्यापार-ते-व्यापार (B2B) बाजारपेठ काबीज करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. 'जेपीपी' अंतर्गत, भारतीय टपाल विभाग, पहिल्या आणि शेवटच्या स्थानकादरम्यान सेवा प्रदान करते आणि भारतीय रेल्वे मधल्या स्थानकांसाठी सेवा प्रदान करते. या अनुषंगाने, 31.03.2022 रोजी सूरत आणि वाराणसी दरम्यान ताप्ती गंगा एक्स्प्रेसला (19045/46) पार्सल बोगी जोडून 'जेपीपी' साठी एक प्रयोगात्मक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. 

रेल्वे, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1885521) Visitor Counter : 131


Read this release in: English , Urdu