ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
ई-वाणिज्य मंचावरील बनावट आणि फसव्या अभिप्रायांपासून ग्राहकांच्या हिताचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी,भारतीय मानक ब्युरोकडून (बीआयएस ) नियम चौकट अधिसूचित
मानके ऐच्छिक असून ग्राहक अभिप्राय प्रकाशित करतात त्या प्रत्येक ऑनलाइन मंचावर लागू आहेत
Posted On:
21 DEC 2022 5:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2022
ई-वाणिज्य मंचावरील बनावट आणि फसव्या अभिप्रायांपासून ग्राहक हिताचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी, भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस 23.11.2022 रोजी ‘ऑनलाइन ग्राहक अभिप्राय — त्यांचे संकलन, नियमन आणि प्रकाशनासाठी तत्त्वे आणि आवश्यकता’ या विषयावर नियमांची चौकट अधिसूचित केली आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.मानके ऐच्छिक आहेत आणि ग्राहक अभिप्राय प्रकाशित करणाऱ्या प्रत्येक ऑनलाइन मंचावर लागू आहेत.प्रामाणिकपणा , अचूकता, गोपनीयता, सुरक्षा, पारदर्शकता, उपलब्धता आणि प्रतिसाद ही मानकांची मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
अभिप्राय लिहिणारी व्यक्ती प्रत्यक्ष आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी आणि अभिप्राय लिहिणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीची खात्री करण्यासाठी मापदंडाच्या अनेक पद्धती आहेत -
- एक किंवा अधिक ईमेल पाठवून आणि प्रतिसादाची प्रतीक्षा करून ईमेल पत्त्याची सत्यता तपासणे
- विषय आणि/किंवा मूल्यमापन केलेल्या उत्पादन किंवा सेवेसंदर्भात ऑनलाइन अभिप्राय दिलेल्या नावासह या व्यक्तीचे या मंचावरील नाव आणि ईमेल पत्ता सत्यापित करणे;
- अभिप्राय देणाऱ्याच्या दुव्यावर क्लिक करून त्यांच्या नोंदणीची खात्री करण्यास सांगणारा एक ईमेल पाठवणे
- संकेतस्थळाचे संरक्षण करणार्या प्रोग्रामद्वारे पडताळणी;
- दूरध्वनी कॉल किंवा एसएमएसद्वारे सत्यापन;
- सिंगल साइन-ऑनद्वारे (एसएसओ) ओळखीचे सत्यापन;
- भौगोलिक स्थान किंवा आयपी ऍड्रेसद्वारे ओळख पडताळणी;
- पहिला अभिप्राय प्रकाशित करण्यापूर्वी अभिप्राय लिहिलेल्या व्यक्तीचा ईमेल पत्ता वैध असल्यासंदर्भात अभिप्राय प्रशासकाद्वारे पडताळणी; आणि
- प्रत्येक ईमेल पत्त्यावर एकल वापरकर्ता वापरून सत्यापन; आणि
- कॅप्चा प्रणाली वापरून पडताळणी.
मानके आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन कशाप्रकारे होईल आणि ती कशाप्रकारे राखावी याची रूपरेषा दर्शवणारी लेखी नियम संहिता कंपनीने विकसित करणे आवश्यक आहे
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1885462)
Visitor Counter : 174