कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2018 ते 2021 या काळात, कायद्याच्या निकषांत अंतर्भूत (आरपीडब्ल्यूडी कायदा 2016 अंतर्गत मान्यताप्राप्त) अपंगत्व असलेल्या 4798 दिव्यांग व्यक्तींना केंद्रसरकारच्या सेवांमध्ये समाविष्ट केल्याची केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

Posted On: 21 DEC 2022 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2022

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली आहे की, 2018 ते  2021 या काळात  कायद्याच्या निकषांत अंतर्भूत (आरपीडब्ल्यूडी कायदा 2016 अंतर्गत मान्यताप्राप्त) अपंगत्व असलेल्या 4798 दिव्यांग व्यक्तींची थेट भरतीद्वारे केंद्रसरकारच्या पदांवर आणि सेवांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरामध्ये त्यांनी आज ही माहिती दिली.

याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि निकषात अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना संबंधित पदांसाठी अर्ज करण्यामध्ये मदत करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना सुरु केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   

मंत्र्यांनी सांगितले की, अंधत्व, लोकोमोटर अपंगत्व (दोन्ही हात प्रभावित) आणि सेरेब्रल पाल्सी या श्रेणीतील बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार आणि बेंचमार्क अपंगत्व असलेल्या उर्वरित उमेदवारांना मुख्य वैद्यकीय अधिकारी/जिल्हा शाल्य चिकित्सक/ सरकारी आरोग्य सेवा संस्थेच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून घेतलेले प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सादर केल्यावर  लेखी परीक्षा/संगणक आधारित परीक्षेसाठी लेखनिकाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

अशा उमेदवारांना ताशी वीस मिनिटे अतिरिक्त वेळ देखील प्रदान केला जातो आणि या तरतुदी परीक्षेच्या निवेदनात समाविष्ट केल्या जातात.

बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी प्रवेशयोग्य कामाच्या जागांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, “सुसंवादित मार्गदर्शक सूचना आणि भारतामधील सार्वत्रिक प्रवेश पात्रता 2021”, “अडथळा विरहित आणि सहज प्रवेश योग्यता पुस्तिका” आणि गृहनिर्माण आणि नगर विकास/केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाद्वारे वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या अन्य पुस्तिकांमध्ये या उपाययोजना यापूर्वीच नमूद करण्यात आल्या असून, बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी प्रवेश योग्य कामाची ठिकाणे निर्माण करण्यासठी त्याचे पालन केले जात आहे.

Categories

Percentage

(a)

blindness and low vision

1%

(b)

deaf and hard of hearing

1%

(c)

locomotor disability including cerebral palsy, leprosy cured, dwarfism, acid attack victims and muscular dystrophy

 

 

1%

(d)

autism, intellectual disability, specific learning disability and mental illness

 

 

 

 

1%

(e)

multiple disabilities from amongst persons under clauses (a) to (d) including deaf-blindness in the posts identified for each disability

R.Aghor/R.Agashe/P.Malandkar 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai     




(Release ID: 1885391) Visitor Counter : 169


Read this release in: Tamil , English , Urdu