कोळसा मंत्रालय
कोल इंडिया कंपनीने इंडोनेशियामधून 3.58 लाख टन कोळसा केला आयात
प्रविष्टि तिथि:
19 DEC 2022 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2022
कोल इंडिया लिमिटेड (CIL) या कंपनीने या वर्षभरात मेसर्स M/s GHV-BDE-DIL (JV) या विक्रेत्या कंपनीमार्फत स्टेट जेन्कोज यांच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी (थर्मल पॉवर प्लांट्स,TPPs) आणि स्वतंत्र उर्जा प्रकल्पांच्या वतीने अंदाजे 3.58 लाख टन कोळसा आयात केला आहे.
उर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आयात केलेला 86% कोळसा वापरला गेला आहे.
विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी कोळशाचा साठा तयार ठेवण्यासाठी, ऊर्जा मंत्रालयाने दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी वीज प्रकल्पांना,मिश्रणाकरिता त्यांच्या कोळशाच्या गरजेपैकी 10%गरजेची पूर्तता करण्यासाठी कोळसा आयात करण्याचा सल्ला दिला होता.
कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1884881)
आगंतुक पटल : 200