वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्र सरकार विणकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
वस्त्रोद्योग मंत्रालय विणकरांना जीआय टॅग देण्यासाठी आणि मुक्त व्यापार करारामध्ये समावेश करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे: सीतारामन
फार्म टू फायबर टू फॅब्रिक टू फॅशन टू फॉरेन ही पंतप्रधानांची 5 एफ संकल्पना वस्त्रोद्योग मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे: सीतारामन
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'विरासत, हाताने विणलेल्या 75 भारतीय साड्यांचा उत्सव ', या विणकाम आधारित हातमाग साडी महोत्सव "माय सारी माय प्राइड" चे केले उद्घाटन
Posted On:
16 DEC 2022 5:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022
विणकरांना जीआय टॅग देण्यासाठी आणि मुक्त व्यापार करारामध्ये समाविष्ट करण्याच्या दिशेने वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील असून भारत सरकार विणकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. आज नवी दिल्ली येथे 'विरासत, हाताने विणलेल्या 75 भारतीय साड्यांचा उत्सव ', या हातमागावर विणलेल्या साड्यांच्या महोत्सवाचे, "माय सारी माय प्राइड" चे उद्घाटन केल्यावर त्या बोलत होत्या.
देशातले विणकर आणि भारताची परंपरा यांचे दर्शन घडवणारा कार्यक्रम मध्य दिल्लीत आयोजित करून वस्त्रोद्योग मंत्रालयाने अनोखे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की मंत्रालयाने हाताने विणलेल्या 75 साड्या मिळवल्या आहेत ज्या येथील प्रदर्शनात मांडल्या आहेत.
सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधानांनी 2014-2015 मध्ये 5 एफ, फार्म टू फायबर टू फॅब्रिक टू फॅशन टू फॉरेन अशी संकल्पना मांडली होती . ही संकल्पना आता वस्त्रोद्योग मंत्रालयाचे मुख्य उद्दिष्ट बनले असून या अंतर्गत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे आणि विणकरांना त्यांचे विणकाम दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
हाताने विणलेल्या साड्यांचे पारंपारिक महत्त्व आणि या उत्कृष्ट साड्या बनवणाऱ्या विणकरांची माहिती देण्यासाठी टच स्क्रीन डिस्प्ले लावण्यात आल्याबद्दल सीतारामन यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या की उद्घाटन प्रसंगी महिला खासदार तर उपस्थित आहेतच , याशिवाय सर्व पुरुष खासदारांना देखील विणकरांशी ओळख करून घेण्यासाठी तसेच प्रदर्शनाला माय हँडलूम सारी , माय सारी , माय प्राइड असे नाव देत पारंपारिक पद्धतीने हाताने विणलेल्या साड्या पाहण्यासाठी आमंत्रित केले होते .
यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश उपस्थित होत्या, त्यांनी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या हाताने विणलेल्या पारंपारिक साड्यांची माहिती दिली.
स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करताना 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव”चे औचित्य साधत 16 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 75 हातमाग विणकरांच्या हातमाग साड्यांचे प्रदर्शन तसेच विक्री केली जाणार आहे. हा महोत्सव 16 ते 30 डिसेंबर 2022 आणि 3 ते 17 जानेवारी 2023 (सकाळी 11 ते रात्री 8) अशा दोन टप्प्यांत नवी दिल्लीतील हँडलूम हाट, जनपथ येथे आयोजित करण्यात आला आहे.
हातमाग क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, शिवाय मोठ्या संख्येने लोकांना, विशेषत: महिलांना रोजगार देणारे हे प्रमुख क्षेत्र आहे. भारतातील हातमाग वारसा प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने, वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून हातमाग साडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतात हातमाग क्षेत्रात 35 लाखांहून अधिक लोक सहभागी आहेत. हातमाग साडी विणण्याच्या कलेशी पारंपारिक मूल्ये जोडलेली आहेत आणि प्रत्येक प्रदेशात उत्कृष्ट साड्यांचे प्रकार आहेत. पैठणी, कोटपड, कोटा डोरिया, तांगेल , पोचमपल्ली, कांचीपुरम, थिरुबुवनम, जामदानी, संतीपुरी, चंदेरी, माहेश्वरी, पटोला, मोइरांगफी, बनारसी ब्रोकेड, तनचोई, भागलपुरी सिल्क, बावनबुटी आणि पश्मीना इत्यादी साड्यांचे प्रकार वैशिष्ट्यपूर्ण कला, विणकाम, डिझाईन्स आणि पारंपारिक नक्षीने जगभरातील ग्राहकांना आकर्षित करतात.
भारतातील काही विशिष्ट ठिकाणांहून निवडलेल्या हातमागावरच्या साड्या प्रदर्शनात विक्रीसाठी मांडल्या आहेत. त्यांची एक संक्षिप्त यादी खाली दिली आहे-
States
|
Prominent sari varieties
|
Andhra Pradesh
|
UppadaJamdhani Sari, VenkatagiriJamdani Cotton Sari, Kuppadam Sari, Chirala Silk Cotton Sari, Madhavaram Sari and Polavaram Sari
|
Kerala
|
Balaramapuram Sari and Kasavu Sari
|
Telengana
|
Pochampally Sari, SiddipetGollabamma Sari and Narayanpet Sari
|
Tamilnadu
|
Kancheepuram Silk Sari, Arni Silk Saris, Thirubuvanam Silk Sari, Vilandai Cotton Sari, Madurai Sari, Paramakudi Cotton Sari, Aruppukottai Cotton Sari, Dindigul Cotton Sari, Coimbatore Cotton Sari, Salem Silk Sari and Coimbatore (Soft) Silk Saris &Kovai Kora Cotton Saris
|
Maharashtra
|
Paithani Sari, KarvathKathi Sari and Nagpur Cotton Sari
|
Chhattisgarh
|
Tussar Silk Sari of Champa
|
Madhya Pardesh
|
Maheshwari Sari and Chanderi Sari
|
Gujarat
|
Patola Sari, Tangaliya Sari, Ashawali sari and Kuchchi Sari/ Bhujodi sari
|
Rajsthan
|
Kota Doria Sari
|
Uttar Pradesh
|
Lalitpuri Sari, Banaras Brocade, Jangla, Tanchoi, Cutwork, and Jamdani
|
Jammu & Kashmir
|
Pashmina Sari
|
Bihar
|
Bhagalpuri Silk Sari and BawanButi Sari
|
Odisha
|
Kotpad Sari and GopalpurTassar Sari
|
West Bengal
|
Jamdani, Santipuri and Tangail
|
Jharkhand
|
Tussar and Gichha Silk Sari
|
Manipur
|
MoirangPhee Sari
|
त्यानुसार, आपल्या हातमाग विणकरांना पाठिंबा देण्यासाठी #MySariMyPride या कॉमन हॅशटॅग अंतर्गत एक सोशल मीडिया मोहीम सुरू केली जात आहे. तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांसाठी विविध उपक्रम आखले आहेत -उदा. - विरासत-वारसा साजरा करणे:हातमाग साड्यांचे प्रदर्शन, विरासत- एक धरोहर: विणकरांकडून साड्यांची थेट किरकोळ विक्री, विरासत के धागे : थेट लूम प्रात्यक्षिक, विरासत-काल से काल तक: साडी आणि शाश्वतता यावर कार्यशाळा आणि संवाद आणि विरासत-नृत्यसंस्कृती यावर चर्चा: भारतीय संस्कृतीतील प्रसिद्ध लोकनृत्ये.
उत्पादनांचे वेगळेपण अधोरेखित करण्याबरोबरच उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना वेगळी ओळख देण्यासाठी शून्य दोष आणि पर्यावरणावर शून्य प्रभाव असलेल्या उच्च दर्जाच्या उत्पादनांचे ब्रँडिंग करण्यासाठी भारत सरकारने हातमाग क्षेत्रासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884178)
Visitor Counter : 234