संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पूर्वावलोकन : यार्ड 12705 (मुरगाव )चे जलावतरण

Posted On: 16 DEC 2022 9:00AM by PIB Mumbai

मुंबईतील नौदल गोदी  येथे संरक्षण  मंत्री  राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत P15B स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिका मुरगाव भारतीय नौदलात दाखल होणार आहे.  'विशाखापट्टणम'  श्रेणीतील चार विनाशिकांपैकी ही दुसरी विनाशिका या कार्यक्रमात नौदलात औपचारिकरित्या समाविष्ट केली जाईल.  भारतीय नौदलाच्या , वॉरशिप डिझाईन ब्युरोने या स्वदेशी जहाजाची रचना केली असून मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधणी  केली आहे. 

या भव्य जहाजाची लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आहे . भारतात निर्मित  सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक म्हणून ही ओळखली जाऊ शकते. हे जहाज चार शक्तिशाली गॅस टर्बाइन्सद्वारे  कम्बाईन  गॅस अँड  गॅस (COGAG) कॉन्फिगरेशनमध्ये चालवले जाते आणि 30 सागरी मैल पेक्षा  जास्त वेग प्राप्त करण्यास सक्षम आहे.  जहाजामध्ये अत्याधुनिक स्टेल्थ वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे रडार क्रॉस सेक्शन (RCS) कमी झाले  आहे.

  ही विनाशिका  ‘अत्याधुनिक’ शस्त्रे आणि सेन्सर्सने परिपूर्ण असून  पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने सुसज्ज आहे.  जहाजावर  टेहळणीसाठी  आधुनिक रडार बसवलेले आहे जे जहाजाच्या तोफखाना शस्त्र प्रणालींना लक्ष्य विषयक माहिती पुरवते.  जहाजाला पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता, स्वदेशी विकसित रॉकेट लाँचर्स, टॉर्पेडो लॉन्चर्स आणि ASW हेलिकॉप्टरद्वारे प्रदान केली जाते. हे जहाज आण्विक, जैविक आणि  रासायनिक  युद्धजन्य  परिस्थितीत लढण्यासाठी सुसज्ज आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ च्या आपल्या  राष्ट्रीय उद्दिष्टावर भर देऊन उत्पादनात सुमारे 75% स्थानिक सामुग्री आणि घटकांचा वापर हे या स्वदेशी जहाजाचे वैशिष्ट्य आहे. मुरगाव  जहाजावरील काही प्रमुख स्वदेशी उपकरणे/प्रणालींमध्ये पृष्ठभाग ते पृष्ठभाग आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो ट्यूब आणि लाँचर्स, पाणबुडी-विरोधी  रॉकेट लाँचर्स, सुपर रॅपिड गन माउंट याशिवाय कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम, ऑटोमेटेड पॉवर मॅनेजमेंट सिस्टम ,  फोल्डेबल हँगर डोअर्स, हेलो ट्रॅव्हर्सिंग प्रणाली ,क्लोज-इन वेपन सिस्टीम आणि बो माउंटेड सोनार  यांचा समावेश आहे. प्रमुख मूळ सामग्री निर्मात्यांसह  बीईएल , एल अँड टी , गोदरेज, मरीन इलेक्ट्रिकल ब्राह्मोस, टेक्निको , किनेको , जीत अँड जीत , सुषमा मरीन , टेक्नो प्रोसेस सारख्या छोट्या एमएसएमई या सर्वांनी बलाढ्य मुरगाव बांधणीत  योगदान दिले आहे.

स्वदेशी बनावट आणि स्वयंपूर्णतेवर स्पष्टपणे भर देत  44 पैकी 42 जहाजे आणि पाणबुड्या भारतीय गोदी मध्ये तयार केल्या जात आहेत, आणि  ‘आत्मनिर्भर भारत’ या दिशेने आपल्या प्रयत्नांना बळ देत आहेत.  याव्यतिरिक्त,भारतीय गोदी मध्ये तयार केल्या जाणाऱ्या  55 जहाजे आणि पाणबुड्यांसाठी AoN प्रदान केले आहे .

पश्चिम किनार्‍यावरील गोव्याच्या ऐतिहासिक बंदर शहराच्या नावावरून, मुरगाव नाव देण्यात आले आहे. जेव्हा गोव्याने पोर्तुगीज राजवटीपासून मुक्तीची  60 वर्षे साजरी केली , तेव्हा मुरगावने योगायोगाने 19 डिसेंबर 21 रोजी  पहिली सागरी मोहीम हाती घेतली, आता 18 डिसेंबर 22 रोजी गोवा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला  तिचे जलावतरण होत आहे. यामुळे  भारतीय नौदलाची गतिशीलता, व्याप्ती आणि हिंद महासागर आणि त्यापलीकडे नौदलाची भूमिका बजावण्यात आणि विविध मोहिमा हाती घेण्यातली  लवचिकता वाढेल.

***

Nilima C/Sushama K/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1884061) Visitor Counter : 225


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil