परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी-20 पहिल्या विकास कार्यगटाच्या मुंबईतील बैठकांची सांगता


मुंबईतील पहिल्या विकास कार्य गटाच्या बैठकीत, विकासासाठीचा डेटा आणि लाईफ (पर्यावरणस्नेही जीवनशैली) या विषयावरील चर्चेचा समारोप

Posted On: 15 DEC 2022 9:42PM by PIB Mumbai

मुंबई, 15 डिसेंबर 2022 

 

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेटा म्हणजेच संकलित माहिती आणि आकडेवारीचा विकासासाठी उपयोग करणे आणि हवामान बदलविषयक कृती यावर भरीव आणि ठोस चर्चा झाली. या विकास कार्य गटाच्या चार दिवसीय बैठकांमध्ये झालेल्या पाच विधायक चर्चासत्रांची आज सांगता झाली.

तिसऱ्या सत्राअंतर्गत  विकासासाठी डेटा या चर्चेची  आज सुरुवात करतांना, विकास कार्य गटाचे अध्यक्षस्थान, सह सचिव नागराज नायडू आणि एनम गंभीर यांनी संयुक्तरित्या भूषविले. यावेळी, 2030 अजेंडयातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना गती देण्याविषयी चर्चा झाली.

“…2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टांची सिद्धता करण्यासाठी, सर्व देश प्रयत्न करत असतांना, आता आता जागतिक स्तरावर समस्याच्या निराकरणासाठी, डिजिटल उपाययोजना आणि प्रणालींवर लक्ष केंद्रित केले आहे जेणेकरून समाजहिताची कार्ये आणि सेवा प्रभावीपणे राबवल्या जाऊ शकतील,” असे या बैठकीत त्यांनी सांगितले.  

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त संचालक (Meity) आणि डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप (डिजिटल अर्थव्यवस्था कृती गट) (DEWG) चे प्रतिनिधी  क्षितिज कुशाग्रा यांनी या समस्येचे परस्परावलंबी हितसंबंधविषयक स्वरूप आणि जी-20 चे दोन प्रवाह म्हणजेच ट्रॅक दरम्यानच्या समन्वयावर प्रकाश टाकला.

त्यानंतर, संयुक्त राष्ट्र महासचिवांचे  तंत्रज्ञानावरील विशेष दूत, अमनदीप सिंग गिल यांनी आरोग्य, शिक्षण, कृषी आणि अन्न सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये डेटा सेटचे डिजिटल इंटेलिजेंसमध्ये प्रभावी संकलन, साठा, विश्लेषण आणि रूपांतर करून त्यायोगे, विकास आणि सहकार्यासाठी निर्माण होऊ शकणाऱ्या जागतिक संधींची रूपरेषा मांडली.

शेवटी, G20 राष्ट्रांनी आपली मते मांडण्यास सुरुवात करण्यापूर्वी, संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकासविषयक परिषदेचे (UNCTAD)ट्रोबजर्न फ्रेड्रिक्सन यांनी विकासासाठी डेटाचा वापर करण्यास कितपत आणि कसा वाव आहे, याविषयचे त्यांचे विश्लेषण सादर केले.

यावेळी जी-20 सदस्य देशांनी, दर्जेदार आणि विश्वासार्ह डेटाची गरज, खाजगी क्षेत्र आणि नागरी समाजाची भूमिका, डिजिटल दरी कमी करण्यासाठीची आवश्यक पावले, विकसनशील राष्ट्रांमध्ये क्षमता वाढवणे आणि विकास कृती गटांच्याच्या कामांशी  डिजिटल आर्थिक कृती गटाच्या कार्याला जोडून घेणे,  यावर आपली मते मांडली.

चौथ्या सत्रात, पर्यावरणस्नेही जीवनशैली (LiFE) वर लक्ष केंद्रित करण्यात आले . भारताच्या जी- 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, भारताने हवामान बदलाच्या समस्येवरील ठोस उपाय म्हणून याला प्रमुख प्राधान्य दिले आहे. "आपण पर्यावरणाचा कसा वापर करतो, याची पुनर्कल्पना करुन, ते प्रत्यक्षात आणण्यासाठीची व्यवस्था आपण कशी उभारू शकतो, हे महत्वाचे आहे,’ असे मत आणि DWG च्या सह-अध्यक्षा एनम गंभीर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. 

भारताच्या प्राचीन शाश्वत परंपरांमधून प्रेरणा घेतलेला  , LiFE हा शाश्वत जीवनासाठी एक धाडसी, परिवर्तनशील दृष्टीकोन आहे जो उपभोग (मागणी) आणि उत्पादन (पुरवठा) दोन्ही पद्धतींमध्ये जागतिक बदल सुचवतो. हा प्रस्ताव, - 'वसुधैव कुटुंबकम' किंवा 'एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य',या  भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेशी, जी  सर्व जीवसृष्टींचे  परस्परसंबंध अधोरेखित करते  आणि या सामायिक ग्रहासाठी या ग्रहावर राहणाऱ्या सर्वांवर समान जबाबदारी ठेवते, या संकल्पनेशीही जवळचा संबंध दाखवतो.

संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्थेचे (UNIDO) जुसेपे डी सिमोन आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमातील (UNEP) दिव्या दत्त यांचे सादरीकरण आर्थिक आणि धोरणात्मक आराखडा, जो LiFE ला डेटा-चालित परिप्रेक्ष्यांसह प्रदान केलेल्या पर्यायी मागणी-पुरवठा प्रतिमानाचे प्रमाण आणि परिणाम प्रतिनिधींना स्वीकारण्यास सक्षम करणारे होते. दत्त यांनी वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि क्रॉस-कटिंग धोरण बदलाच्या संदर्भात "शाश्वत जीवनशैली महत्वाकांक्षी बनवण्याचे" महत्त्व देखील मांडले.

G20 देशांच्या प्रतिनिधींनी शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) 12: 'जबाबदार उपभोग आणि उत्पादना' वर भारताचे लक्ष केंद्रित करण्याचे स्वागत केले. सोबतच, स्थानिक वास्तविकता आणि ज्ञान एकत्रित करण्यासाठी, व्याप्ती आणि प्रमाणाचे वर्णन करण्यासाठी तसेच या क्षेत्रातील बदलांना सक्षम आणि प्रोत्साहन देणारे धोरणात्मक उपाय ओळखण्यासाठीही प्रशंसा केली.

हे चर्चासत्र ,2023 G20 नवी दिल्ली अद्यतनित माहिती सत्र 5 सह, भारताच्या विकास कार्य गटाच्या (DWG) सह-अध्यक्ष गंभीर यांच्या टिप्पण्या आणि सादरीकरणासह तसेच परिणाम दस्तऐवजाच्या संदर्भाच्या अटींवर चर्चा आणि विकास कार्य गटाच्या सह-अध्यक्षांच्या समारोपाच्या टिप्पण्यांसह समाप्त झाले. 

संध्याकाळी विकास कार्य गटाच्या सह-अध्यक्षांनी जीओ  वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विकास कार्य गटाच्या उपक्रमांचे तपशीलवार आढावा  आणि भविष्यातील बैठकांसाठी गटाच्या योजनांबद्दल माहिती दिली. G20 प्रतिनिधींनी केंद्राच्या लॉनवर रात्रभोजनाचा आस्वाद घेतला. 

सत्रांदरम्यान, प्रतिनिधींना भारतीय तंदुरी चाय (चहा) च्या अनोख्या चवीचा आनंद घेता आला; ज्यात  गरम तंदूरमध्ये कुल्हड (छोटा मातीचा कप) ठेवण्यासाठी वापरलेल्या लोखंडी चिमट्याच्या धुराची चव मुरवली असते..

दोन दिवसांच्या गहन विचारमंथनानंतर, प्रतिनिधींना मुंबईच्या सांस्कृतिक आणि झपाट्याने वाढणाऱ्या शहरी महानगरात हरित मरुभूमी अनुभवण्याची संधी देण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफांची सहल उद्या नियोजित करण्यात आली आहे.

 

* * *

(Source: G-20 Secretariat)

PIB Mumbai | S.Kakade/R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1883950) Visitor Counter : 268


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Odia