नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुंबई आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान थेट विमानसेवेचे केले उद्घाटन
ही सेवा आठवड्यातून तीन दिवस चालवण्यात येईल
Posted On:
15 DEC 2022 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2022
केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी आज मुंबई आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान थेट विमानसेवेचे उद्घाटन केले.
या मार्गावर एअर इंडिया 15 डिसेंबर 2022 पासून खालील वेळापत्रकानुसार विना- थांबा विमान सेवा चालवेल:
Flt No.
|
From
|
To
|
Freq.
|
Dep. Time (LT)
|
Arr. Time (LT)
|
AI179
|
BOM
|
SFO
|
Thrice a week
|
1430
|
1700
|
AI180
|
SFO
|
BOM
|
Thrice a week
|
2100
|
0340+2
|
आपल्या भाषणात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्र परिवर्तन घडवत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्ग्या 68 वर्षात केवळ 74 विमानतळ होते , ज्यात आता वाढ होऊन ही संख्या 145 वर गेली आहे, यात हेलीपोर्ट आणि वॉटर एरोड्रोमचा समावेश आहे. देशात नागरी विमान वाहतुकीचे लोकशाहीकरण झाले आहे. 2013-14 मध्ये प्रवासी संख्या 63 दशलक्ष होती, ती 2019-20 या वर्षात 144 दशलक्ष पर्यंत गेली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येतही अशीच वाढ दिसून आली आहे.
त्यांनी भारतीय विमान कंपन्यांना वाढत्या आंतरराष्ट्रीय वाहतुकीकडे लक्ष देण्याचे आणि सध्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचे वर्चस्व असलेली लांब पल्ल्याच्या मार्गाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आणखी मोठी विमाने खरेदी करण्याचे आवाहन केले.
सिंधिया पुढे म्हणाले की, दिल्लीत भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार प्रमुख विमान कंपन्यांशी चर्चा करत आहे ज्याचा अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांवर व्यापक प्रभाव पडेल.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883947)
Visitor Counter : 203