वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताच्या नोंदणीकृत भौगोलिक मानांकनांच्या (जीआय) संख्येत भर, ही संख्या 432 वर पोहोचली
आसामचा प्रसिद्ध गामोसा, तेलंगणाचा तंदूर रेडग्राम, लडाखचा रक्तसेकार्पो जर्दाळू, महाराष्ट्राचा अलिबाग पांढरा कांदा यांना मिळाला जीआय टॅग
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2022 5:44PM by PIB Mumbai
वैविध्यपूर्ण संस्कृती असलेला भारत हा अनेक पिढ्यांनी प्रभुत्व मिळवलेल्या विविध कला आणि हस्तकलांचं माहेरघर आहे. भारतातल्या विविध राज्यांमधील उत्पादनांनी भारताकडे असलेल्या भौगोलिक मानांकनांच्या (जीआय टॅग) संख्येत भर घातली आहे. आसामचा प्रसिद्ध गामोसा, तेलंगणचा तंदूर रेडग्राम, लडाखचा रक्तसेकार्पो जर्दाळू, महाराष्ट्राचा अलिबागचा पांढरा कांदा या उत्पादनांना प्रतिष्ठेचा जीआय टॅग देण्यात आला आहे. यासह भारताकडे असलेल्या जीआय टॅगची एकूण संख्या 432 वर पोहोचली आहे. कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांकडे सर्वात जास्त जीआय टॅग आहेत.
डीपीआयआयटी द्वारे विविध भागधारकांच्या सहकार्याने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून, यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण जीआय उत्पादनांच्या माध्यमातून भारतीय परंपरा, संस्कृती आणि औद्योगिक उपक्रम एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत:
नवी दिल्लीमध्ये आयटीपीओ येथे पाच दिवस (26 ते 30 एप्रिल 2022) जीआय पॅव्हेलियन (आहार 2022), ग्रेटर नोएडा येथे इंडिया एक्स्पो सेंटर एंड मार्ट येथे इंडिया जीआय (26-28 ऑगस्ट 2022) आयोजित करण्यात आले. व्यापार सुविधा केंद्र, वाराणसी येथे साप्ताहिक जीआय महोत्सव (16 ते 21ऑक्टोबर 2022) आयोजित करण्यात आला.
आयटीपीओ ने 14 ते 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या आयआयटीएफ 2022 मध्ये एक विशेष जीआय पॅव्हेलियन उभारण्यात आला होता.
देशात विविध संस्कृतीच्या समाजांच्या परस्पर उभारणीला चालना देत, अशा उपक्रमांमुळे राज्यांमध्ये विविध उत्पादनांच्या आदान-प्रदानाला प्रोत्साहन तर मिळेलच पण भविष्यात एक चांगला चेतनामय संस्कृतीचा समाज निर्माण करायला पाठबळ मिळेल.
सरकारने अलीकडेच, जीआय बाबत प्रचार आणि जनजागृती कार्यक्रमांवर तीन वर्षांच्या कालावधीसाठी 75 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देऊन जीआय च्या प्रचाराला पाठींबा दिला आहे.
***
ShaileshP/Rajashree/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1883653)
आगंतुक पटल : 331