अणुऊर्जा विभाग

दुर्मिळ पृथ्वी खनिजे मिळवण्यासाठी भारत चीनवर अवलंबून नाही - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह


भारतातील दुर्मिळ पृथ्वी खनिजाचा प्राथमिक स्त्रोत असलेल्या मोनाझाइटचे दरवर्षी सुमारे 4000 मेट्रिक टन उत्पादन - डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 14 DEC 2022 5:20PM by PIB Mumbai

दुर्मिळ  पृथ्वी  खनिजे मिळवण्यासाठी भारत चीनवर अवलंबून नाही,  असे,   केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञानराज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान;  पंतप्रधान कार्यालय कार्मिकसार्वजनिक तक्रारीनिवृत्तीवेतनअणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह  यांनी  सांगितले.

भारतातखाणकामप्रक्रियाउत्खननशुद्धीकरण आणि उच्च शुद्ध आरई ऑक्साईड्सचे उत्पादन या बाबतीत,    सामर्थ्य आणि क्षमता पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेतअसे डॉ.जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

भारतातील दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा प्राथमिक स्रोत असलेल्या  मोनाझाइटचे उत्पादन दरवर्षी सुमारे 4000 मेट्रिक टन आहे.

आयआरईएल(इंडिया) लिमिटेड पूर्वीची इंडिया रेअर अर्थस लिमिटेडने  सुमारे 10,000 मेट्रिक टन दुर्मिळ पृथ्वी संबंधित खनिजावर प्रक्रिया करण्याची क्षमता स्थापित केली असली तरीखाणपट्टे मंजूर न करणे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून  पर्यावरण आणि किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड)मंजुरी, कार्यान्वयन संमतीवन आणि अनियंत्रित वस्तीमुळे  निर्बंध इ.कारणांमुळे उत्पादन मर्यादित आहेअसे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

सप्टेंबर 2022 मध्येअणु खनिज संचालनालय अन्वेषण आणि संशोधन (एएमडी) ची स्थापना करण्यात आली आहे.

केरळतामिळनाडूओदीशाआंध्र प्रदेशमहाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये किनारपट्टीवरच्या खनिजयुक्त वाळूमध्ये तसेच झारखंडपश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या काही भागात अंतर्गत ठिकाणांवर

13.07 दशलक्ष टन इन-सिटू मोनाझाइट (55-60% एकूण दुर्मिळ पृथ्वी घटक  ऑक्साईड असलेले) स्त्रोत आढळतात.

7,37,283 टन दुर्मिळ पृथ्वी घटक ऑक्साईड (आरईओ) गुजरातमधील छोटा उदेपूर जिल्ह्यात अंबाडुंगर परिसरात आढळले.

राजस्थानमध्ये बाडमेरा जिल्ह्यातील भाटीखेरा परिसरात 36,945 टन आरईओ आढळले.

छत्तीसगड आणि झारखंडमध्ये नदीच्या खनिजयुक्त गाळामध्ये ~2% झेनोटाइम (यीट्रियम आणि दुर्मिळ पृथ्वी घटकांचे फॉस्फेट खनिज) असलेले 2,000 टन जड खनिज साठा आहे.सध्याएएमडी ,छत्तीसगडमध्ये स्थापन केलेल्या युनिटमध्ये झेनोटाईम बेअरिंग हेवी मिनरल कॉन्सन्ट्रेटचे संकलन करत आहे आणि त्याच्याकडे 97.688 टन झेनोटाइम बेअरिंग हेवी मिनरल कॉन्सन्ट्रेटचा साठा आहे.

याशिवायभारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (जीएसाय) देशाच्या विविध भागांमध्ये दुर्मिळ पृथ्वी घटक  (आरईई) आणि दुर्मिळ धातू (आरएम) यासह विविध खनिज वस्तूंसाठी मॅपिंग आणि शोध उपक्रम राबवते संभाव्य खनिजयुक्त स्थाने तसेच  खनिज स्त्रोत वाढवणे हा त्यामागील उद्देश आहे.

उच्च शुद्ध आरई ऑक्साईडचे उत्पादनखाणकामप्रक्रियाउत्खननशुद्धीकरण आणि उत्पादनाच्या बाबतीत सामर्थ्य आणि क्षमता भारतात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.

1950 पासून खाजगी क्षेत्रासह सर्वांसाठी रेडिओअॅक्टिव्हिटीपासून  योग्यरित्या मुक्त ऑक्साईड/संयुगांच्या स्वरूपात आरई उपलब्ध आहे. दुर्मिळ पृथ्वी मूल्य साखळी विकसित करण्याच्या संदर्भातएक दुर्मिळ पृथ्वी थीम पार्क स्थापित केला जात आहे जो प्रयोगशाळेत सिद्ध झालेल्या वैज्ञानिक तत्त्वांना प्रायोगिक स्तरावर पुढे नेईल आणि व्यावसायिक कार्यान्वयन  सुरू करण्यास इच्छुक असलेल्या उद्योगांना ही तत्वे प्रदर्शित करेल. याशिवाय,भविष्यात कर्मचार्‍यांचा विकास करण्यासाठी कौशल्य विकास उपक्रमही थीम पार्कच्या माध्यमातून  हाती घेतले जाणार आहेत.

अन्वेषण आणि संशोधनासाठी अणु खनिज संचालनालय (एएमडी)अणुऊर्जा संचालनालयाचा एक विभागजड खनिज संसाधनांच्या विकासासाठी  देशाच्या किनारी / अंतर्गत भागात  / नदीतील खनिजयुक्त वाळूत  दुर्मिळ पृथ्वी घटक स्त्रोतांच्या वाढीसाठी  अन्वेषण करत आहे,यात  मोनाझाइट (आरईई आणि थोरियमचे खनिज) आणि झेनोटाईम (आरईई आणि यट्रियमचे खनिज) तसेच देशातील अनेक संभाव्य भूगर्भीय   (कठीण खडक) यांचा समावेश होतो.

***

ShaileshP/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883629) Visitor Counter : 192


Read this release in: English , Urdu