गृह मंत्रालय
जनगणना 2021 मधील विलंब
Posted On:
14 DEC 2022 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2022
2021 मध्ये जनगणना घेणार असल्याचे सरकारने 28 मार्च, 2019 च्या भारतीय राजपत्राद्वारे अधिसूचित केले होते. कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे, 2021 ची जनगणना आणि संबंधित क्षेत्रीय उपक्रम पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.
प्रशासकीय केंद्रांच्या सीमा गोठविण्याची तारीख 31.12.2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
डेटा गोळा करण्यासाठी मोबाईल आणि वेब अॅप्लिकेशन्स आणि जनगणनेशी संबंधित विविध उपक्रमांचे व्यवस्थापन आणि त्याची देखरेख करण्यासाठी पोर्टल (सीएमएमएस) विकसित करण्यात आली आहेत.
मोबाईल अॅप्लिकेशन्स, वेब अॅप्लिकेशन्स, सीएमएमएस पोर्टल आणि संबंधित उपक्रम विकसित करण्यासाठी आतापर्यंत 24.84 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883591)
Visitor Counter : 289