दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
देशात 5जी नेटवर्क सेवेचा प्रारंभ- सद्यस्थिती
Posted On:
14 DEC 2022 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2022
दूरसंचार सेवा पुरवठादारांनी (टीएसपी) 01.10.2022 पासून देशात 5जी सेवेचा पुरवठा सुरु केला आहे आणि 26.11.2022 पर्यंत, देशातील 14 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 50 शहरांमध्ये 5जी सेवा सुरू झाल्या आहेत. (परिशिष्ट)
स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी आणि परवान्यांच्या अटींसाठी अर्ज मागवण्याकरता 15-06-2022 रोजी जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, स्पेक्ट्रम वाटपाच्या तारखेपासून टप्प्याटप्प्याने, पाच वर्षांच्या कालावधीत पुरवठ्याबाबतच्या (रोलआउट) दायित्वांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच, अनिवार्य रोलआउट दायित्वांच्या पलीकडे मोबाइल नेटवर्कचा पुढील विस्तार, दूरसंचार सेवा पुरवठादारांच्या (टीएसपी) तांत्रिक-व्यावसायिक स्वीकृतीवर अवलंबून असेल.
दूरसंचार विभाग (डीओटी) ने भारतीय टेलिग्राफ (सुधारणा) नियम 2017 मध्ये केलेल्या तरतुदीनुसार, दूरसंचार उपकरणांचे प्रमाणीकरण (एमटीसीटीई) अनिवार्य असेल.
यामध्ये असे नमूद केले आहे की, केंद्र सरकारने भारतीय टेलिग्राफ कायदा, 1885 च्या कलम 4 अंतर्गत जारी केलेल्या परवान्या अंतर्गत स्थापित, देखरेख किंवा काम करणाऱ्या कोणत्याही टेलीग्राफसह वापरल्या जाणार्या किंवा वापरण्यासाठी सक्षम असलेल्या कोणत्याही टेलीग्राफला टेलिग्राफ प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नियमावलीच्या संदर्भात पूर्व चाचणी आणि प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असेल. त्याशिवाय, दूरसंचार परवान्यामध्ये 10.03.2021 रोजी दूरसंचार विभागाने एक सुधारणा जारी केली असून, त्यामध्ये सर्व परवानाधारकांना 15.06.2021 पासून त्यांच्या दूरसंचार नेटवर्कमध्ये केवळ विश्वसनीय उत्पादने जोडण्याचे निर्देश दिले आहेत. दूरसंचार क्षेत्रामध्ये (एनएसडीटीएस) राष्ट्रीय सुरक्षा निर्देशांच्या तरतुदी लागू करण्यासाठी ही सुधारणा जारी करण्यात आली आहे. दूरसंचार नेटवर्कची सुरक्षा वाढविण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केवळ विश्वासार्ह स्रोतांकडून दूरसंचार उपकरणे मिळवता यावीत, यासाठी एक यंत्रणा स्थापन करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
परिशिष्ट
26.11.2022 रोजी 5जी सेवा सुरू झालेल्या शहरांची राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार यादी:
S. No.
|
State/UT
|
Town
|
1
|
Delhi
|
Delhi
|
2
|
Maharashtra
|
Mumbai
|
Nagpur
|
Pune
|
3
|
West Bengal
|
Kolkata
|
Siliguri
|
4
|
Uttar Pradesh
|
Varanasi
|
Lucknow
|
5
|
Tamilnadu
|
Chennai
|
6
|
Karnataka
|
Bangalore
|
7
|
Telengana
|
Hyderabad
|
8
|
Rajasthan
|
Jaipur
|
9
|
Haryana
|
Panipat
|
10
|
Assam
|
Guwahati
|
11
|
Kerala
|
Kochi
|
12
|
Bihar
|
Patna
|
13
|
Andhra Pradesh
|
Visakhapatnam
|
14
|
Gujarat
|
Ahmedabad
|
Gandhinagar
|
Bhavnagar
|
Mehsana
|
Rajkot
|
Surat
|
Vadodara
|
Amreli
|
Botad
|
Junagadh
|
Porbandar
|
Veraval
|
Himatnagar
|
Modasa
|
Palanpur
|
Patan
|
Bhuj
|
Jamnagar
|
Khambhalia
|
Morvi
|
Wadhwan
|
AHWA
|
Bharuch
|
Navsari
|
Rajpipla
|
Valsad
|
Vyara
|
Anand
|
Chota Udaipur
|
Dohad
|
Godhra
|
Lunawada
|
Nadiad
|
दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883576)
Visitor Counter : 204