कोळसा मंत्रालय
कोळसा उत्पादन आणि कोळशावर आधारित वीज निर्मितीचे नोव्हेंबर 2022 पर्यंतचे तपशील
Posted On:
14 DEC 2022 1:02PM by PIB Mumbai
2021-2022 मध्ये भारतातील कोळशाचे एकूण उत्पादन 778.19 दशलक्ष टन (एमटी) होते. 2020-2021 मध्ये ते 716,083 दशलक्ष टन इतके होते. त्याशिवाय, चालू आर्थिक वर्षात (नोव्हेंबर 22 पर्यंत) गेल्या वर्षी याच काळाच्या तुलनेत 17% वाढीसह देशात अंदाजे 524.2 एमटी कोळसा उत्पादन झाले. गेल्या वर्षी ते 448.1 एमटी इतके होते.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (सीईए) माहिती दिली आहे की देशातील कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये, 07.12.2022 पर्यंत उपलब्ध कोळशाचा साठा सुमारे 31 मेट्रिक टन इतका असून, तो 85% पीएलएफ च्या गरजेनुसार सरासरी 11 दिवसांसाठी पुरेसा आहे. त्यामुळे, देशात कोळशाचा तुटवडा नाही.
2020-21, 2021-22 आणि 2022-23 (एप्रिल ते नोव्हेंबर) दरम्यान देशातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत कोळशावर आधारित वीजनिर्मिती, एकूण निर्मिती आणि कोळशापासून होणाऱ्या निर्मितीची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.
Fuel
|
2020-21
|
2021-22
|
2022-23 (April to November)*
|
Coal based generation (Billion Units)
|
950.9
|
1041.5
|
747.8
|
Total Generation (Billion Units)
|
1381.9
|
1491.9
|
1089.9
|
% of Coal based Generation
|
68.8
|
69.8
|
68.6
|
कोळसा, खाणकाम आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
Sushama Kane/Rajashree Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883389)
Visitor Counter : 330