परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

मुंबईत आयोजित जी-20 विकास कार्यगटाच्या (डीडब्ल्यूजी) बैठकीचा पहिला दिवस

Posted On: 13 DEC 2022 10:08PM by PIB Mumbai

मुंबई, 13 डिसेंबर 2022 

 

भारताच्या अध्यक्षतेखालील जी-20 विकास कार्यगटाची (डीडब्ल्यूजी) पहिली बैठक सध्या मुंबईत सुरु आहे. सदस्य, अतिथी देश आणि निमंत्रित आंतरराष्ट्रीय संस्था या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित आहेत.

विकास कार्यगटाच्या तीन दिवसीय बैठकीत शाश्वत विकास उद्दिष्टांबाबतच्या (एसडीजी) प्रगतीला चालना देण्यासाठी तसेच अन्न, इंधन आणि खतांच्या सुरक्षेशी संबंधित सध्याच्या समस्या हाताळायला विकसनशील देशांना सहाय्य देण्यासाठी जी-20 देशांच्या एकत्रित प्रयत्नांवर भर दिला जाईल.      

बैठकीच्या पहिल्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर “डेटा फॉर डेव्हलपमेंट (डी4डी): रोल ऑफ जी-20 इन ऍडव्हानसिंग दी  2030 अजेंडा  आणि “इन्फ्युजिंग न्यू लाईफ इंटू ग्रीन डेव्हलपमेंट” या दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

डी4डी कार्यक्रम  ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओआरएफ), संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे तंत्रज्ञान विषयकदूत  कार्यालय (ओएसईटी), आणि संयुक्त राष्ट्रांची व्यापार आणि विकास विषयक परिषद (युएनसीटीएडी) यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आली होती. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात शेर्पा ट्रॅक अंतर्गत विकास कार्यगटामध्ये होणार्‍या डी4डी मधील पुढील चर्चांची सुरुवात, या स्वरुपात या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. 

डी4डी सत्राची सुरुवात भारताचे जी-20 शेर्पा अमिताभ कांत यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. आपल्या भाषणात कांत यांनी विकसनशील आणि विकसित देशांमधील नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी चांगल्या दर्जाचे तसेच अत्याधुनिक आणि सहज उपलब्ध डेटाचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले की डेटा, प्रत्येक राजकीय नेता आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला त्यांच्या लोकांप्रती उत्तरदायी बनवेल.

या सत्रात केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री तसेच केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर; विकासासाठी सर्वसमावेशक वित्तपुरवठा संदर्भातील संयुक्त राष्ट्र महासचिवांच्या विशेष अधिवक्ता आणि  नेदरलँड्सच्या महाराणी मॅक्सिमा आणि इन्फोसिसचे  बिगर -कार्यकारी अध्यक्ष आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे  (युआयडीएआय ) माजी अध्यक्ष  नंदन निलेकणी यांची   प्रमुख भाषणे झाली.

''आपण विश्वास आणि संरक्षणाच्या एकत्रित दृष्टीद्वारे  डिजिटल अर्थव्यवस्थेकडे पाहिले पाहिजे.  तंत्रज्ञान, डिजिटल इंटरनेट आणि खऱ्या  डेटासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक आराखडा तयार करण्यासाठी आपण एकत्रित काम केले पाहिजे जो सार्वजनिक हिट आणि शाश्वत विकासाला मुख्य प्रवाहात आणेल,  असे राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

“वित्तीय समावेशन हे विकासाचे एक सामर्थ्यशाली साधन आहे.17 पैकी 8 शाश्वत विकास उद्दिष्टे  ही  शून्य दारिद्र्य, भुकेलेले नसणे, चांगले आरोग्य, लिंग समानता आणि आर्थिक विकास  साध्य करण्यात सहाय्य करण्याचा एक मार्ग म्हणून अधोरेखित करतात, असे   विकासासाठी सर्वसमावेशक वित्तपुरवठा संदर्भातील संयुक्त राष्ट्र महासचिवांच्या विशेष अधिवक्ता आणि नेदरलँड्सच्या महाराणी मॅक्सिमा यांनी आपल्या भाषणात सांगितले.

“स्वतःचा डेटा  हा विकासासाठी सर्वात महत्त्वाचा डेटा  असतो. विविध सेवांमध्ये प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने , परिवर्तनात्मक असलेली डेटा सक्षमीकरणाची अनोखी भारतीय रचना, व्यक्ती आणि लहान व्यवसायांना त्यांचा स्वतःचा डेटा वापरण्याची परवानगी देते, असे नंदन निलेकणी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

डी 4डी  कार्यक्रमादरम्यान 'वारसा प्रणालीचे पुनरुज्जीवन :डेटा पासून सार्वजनिक मूल्य बुद्धिमत्ता पर्यंत ' तसेच  'भविष्यासाठी मॉडेल्स : शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी आयओटी, बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ घेणे' या   विषयावर दोन  सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.  या सत्रांना सरकारचे  , आंतरसरकारी संस्थांचे, नागरी समाजाचे  आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधींसह  विविध क्षेत्रातील व्यक्ती  उपस्थित होत्या .

दुपारच्या जेवणानंतरचा कार्यक्रम  'इन्फ्युजिंग न्यू लाईफ (LiFE  पर्यावरणासाठी जीवनशैली   )इंटू ग्रीन डेव्हलपमेंट'  या संकल्पनेखाली झाला. हा कार्यक्रम ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषद (सीईईडब्लू ), संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (युएनईपी), संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना (यूएनआयडीओ ) आणि 10वायएफपी /वन प्लॅनेट नेटवर्क यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.

भारताचा लाइफ (LiFE पर्यावरणासाठी जीवनशैली) उपक्रम हवामान आणि विकास उद्दिष्टांसह शाश्वत  विकास उद्दिष्टे  (एसडीजी) साध्य करण्यासाठी बहुपक्षीय कृती कशी उत्प्रेरित करू शकतो यावर भर देण्यात आला. सामूहिक हवामान कृती आणि लाईफ  हे भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचे प्राधान्य आहे. 

लाइफ सत्रातील उद्घाटनपर भाषणात  भारताचे शेर्पा अमिताभ कांत म्हणाले, "लाइफ महत्त्वपूर्ण आहे कारण भारतासारख्या देशात वेगाने शहरीकरण होईल आणि वैयक्तिक आणि सामूहिक वर्तनावर बरेच काही अवलंबून असेल." 

भूतानच्या महाराणी  जेत्सुन पेमा यांनी या अधिवेशनात बीजभाषण केले.   जी 20 अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल त्यांनी भारताचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अध्यक्षपदाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत विवेकपूर्ण आणि यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्‍वास जगाला वाटतो, अशी टिप्पणी त्यांनी केली. 

या वेळी संयुक्त राष्ट्रांच्या उप महासचिव अमिना जे मोहम्मद यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला.  नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांचे लाइफवरील सादरीकरण झाले. आणि ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेचे (सीइइडब्लू)  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अरुनभ घोष यांचाही प्रमुख वक्त्यांमधे समावेश होता.

लाइफसह शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाला चालना आणि लाइफ शाश्वत आर्थिक परिवर्तन अधिक सक्षम कसे करू शकते यावर दोन चर्चाही यावेळी झाल्या. संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्यक महासचिव आणि संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या (न्यूयॉर्क) प्रमुख लिगिया नोरोन्हा, स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखचे  (एसइसीएमओएल) संस्थापक आणि अध्यक्ष सोनम वांगचुक, आणि इको नेटवर्कच्या  जागतिक संचालक डॉ शॅनन बी ओल्सन प्रेरणादायी वक्ते म्हणून सहभागी झाले.

सत्रातील इतर वक्त्यांमध्ये युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य आणि ग्रँथम रिसर्च इन्स्टिट्यूट ऑन क्लायमेट चेंज अँड द एन्व्हायर्नमेंट,एलएसइचे अध्यक्ष लॉर्ड निकोलस स्टर्न, इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सीच्या उपमहासंचालक गौरी सिंग, एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट आणि  संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाचे माजी अवर महासचिव  नितीन देसाई,  ग्लोबल एन्व्हायर्नमेंटल स्ट्रॅटेजीजचे (आयजिइएस) कार्यक्रम संचालक डॉ. अत्सुशी वाताबे आणि धोरण संशोधन केंद्राचे (सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च)चे प्राध्यापक डॉ नवरोज दुबाश यांची भाषणेही यावेळी झाली.

महाराष्ट्राचे  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सभेच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.

सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील समृद्ध लोकनृत्य आणि संगीत परंपरांचे दर्शन घडले. अभंग, कोळी, सुफी, लावणी, गोंधळ आणि जोगवा हे काही लोकनृत्य प्रकार मान्यवरांसमोर सादर करण्यात आले. दिवसभरातले सर्वात मोठे आकर्षण ठरला प्रचंड-ऊर्जेने सादर झालेला तालवाद्य कार्यक्रम - 50-सदस्यांच्या समूहाद्वारे पुणेरी ढोल, ज्यात बहुसंख्य महिला होत्या. या प्रसंगी जी 20 बोधचिन्हाच्या प्रतिमेसह प्रकाशमय करण्यात आलेल्या  गेटवे ऑफ इंडियाचा मार्गदर्शित दौराही मान्यवरांसाठी आयोजित करण्यात आला.

भेट देणाऱ्या मान्यवरांसाठी मुंबईतील प्रसिद्ध कान्हेरी लेणी पाहण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Kakade/Rajshree/Prajna/Sonal C/Vasanti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883248) Visitor Counter : 227


Read this release in: English , Urdu , Hindi , Assamese