ऊर्जा मंत्रालय
देशातील विजेचे उत्पादन आणि वितरण
Posted On:
13 DEC 2022 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2022
देशात सध्या सुमारे 408.72 गिगावॅट (जीडब्ल्यू) वीज क्षमता प्रस्थापित करण्यात आली असून, ती देशाची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. चालू वर्ष 2022-23 (ऑक्टोबर, 2022 पर्यंत) मध्ये देशातील सर्व पारंपरिक आणि अपारंपरिक स्रोतांद्वारे 970,683 दशलक्ष युनिट (एमयु) वीज निर्मिती करण्यात आली असून, विजेचे उत्पादन विजेच्या मागणीशी सुसंगत आहे.
भारत सरकारने डिसेंबर 2014 मध्ये दीन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचा (डीडीयुजीजेवाय) शुभारंभ केला. जनगणना झालेल्या सर्व गावांचे 28 एप्रिल 2018 पर्यंत या योजनेअंतर्गत विद्युतीकरण झाले होते. योजनेअंतर्गत एकूण 18,374 गावांचे विद्युतीकरण करण्यात आले.
ही माहिती केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तरामधून दिली.
* * *
S.Kakade/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883221)
Visitor Counter : 243