गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

प्रधानमंत्री आवास योजना- शहरी(PMAY-U) ची प्रगती

Posted On: 12 DEC 2022 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2022

 

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय 25 जून 2015 पासून सर्व पात्र शहरी लाभार्थ्यांना पक्की घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना- शहरी(PMAY-U) अंतर्गत चार श्रेणींतर्गत म्हणजे मुख्यत्वे 1) लाभार्थ्याकडून होणारे बांधकाम (बीएलसी) 2) भागीदारीत परवडण्याजोगे घर(एएचपी), 3) इन सिटू झोपडपट्टी पुनर्विकास (आयएसएसआर) आणि कर्ज आधारित अनुदान योजना (सीएलएसएस) या अंतर्गत केंद्रीय मदत उपलब्ध करत आहे. या योजनेंतर्गत 31 मार्च 2022 पर्यंत एकूण 122.69 लाख घरे मंजूर करण्यात आली. त्यानंतर 31.3.2022 पर्यंत मंजूर झालेली घरे बांधून पूर्ण व्हावीत यासाठी या योजनेला 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव काळात कोणत्याही नव्या घरांना मंजुरी देण्यात येणार नाही. मात्र, 122.69 लाख घरांच्या सर्वोच्च मर्यादेपर्यंत राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना मंजुरीप्राप्त, बांधकाम सुरू न झालेल्या बीएलसी/एएचपी/आयएसएसआर घरांना कमी करून त्यांच्या जागी नव्या बीएलसी घरांचे बांधकाम करण्यास परवानगी आहे. बीएलसी घरांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी साधारणतः 12 ते 18 महिने लागतात आणि एएचपी/आयएसएसआर घरांना 24 ते 36 महिन्यांचा कालावधी लागतो.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1882948) Visitor Counter : 184


Read this release in: English , Urdu , Kannada